बीडच्या जिल्हा रूग्णालयात कोराेनाबाधित महिलेवर म्युकरमायकोसिसची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 05:07 PM2021-06-19T17:07:04+5:302021-06-19T17:07:29+5:30

१५ दिवस उपचार घेत कोरोनामुक्त होऊन घरी परतली. परंतू मागील आठवडाभरपासून तिला त्रास सुरू झाल्याने ती जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. तिचा सीटी स्कॅन केला असता म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसली.

First successful surgery for mucormycosis on a woman with corona disease at Beed District Hospital | बीडच्या जिल्हा रूग्णालयात कोराेनाबाधित महिलेवर म्युकरमायकोसिसची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

बीडच्या जिल्हा रूग्णालयात कोराेनाबाधित महिलेवर म्युकरमायकोसिसची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

Next

बीड : येथील जिल्हा रूग्णालयात पहिल्यांदाच म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया (दुर्बिनद्वारे) शनिवारी दुपारी यशस्वी पार पडली. यापूर्वी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात म्युकरमायकोसिसवर शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झालेल्याचा दोन दिवसांपूर्वीच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

वडवणी तालुक्यातील ६५ वर्षीय महिला १४ एप्रिल रोजी कोरोनााबाधित आढळल्याने लोखंडी सावरगाव येथील रूग्णालयात दाखल झाली. १५ दिवस उपचार घेत कोरोनामुक्त होऊन घरी परतली. परंतू मागील आठवडाभरपासून तिला त्रास सुरू झाल्याने ती जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. तिचा सीटी स्कॅन केला असता म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसली. त्यामुळे तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी तिची अँटिजन चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतू तरीही शनिवारी दुपारी या महिलेला शस्त्रक्रिया गृहात घेण्यात आले. सुरूवातीला इन्डोस्कोपीक सायनस डिब्राईडमेंट ही शस्त्रक्रिया सुरू केली. परंतू तरीही संसर्ग जास्त असल्याने आणखी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बीडमध्येच शस्त्रक्रिया आणि उपचार मिळत असल्याने सामान्यांना दिलासा मिळत आहे.

या टिमने घेतले परिश्रम
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.अशोक हुबेकर, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सचिन कोल्हे, डॉ.सुधाकर बीडकर, डॉ.अभिषेक जाधव, डॉ.मिनाक्षी साळुंके, डॉ.साेमनाथ वाघमारे, परिसेविका जयश्री उबाळे, वैशाली सपकाळ, अधिपरिचारीका मिता लांबोरे, महेंद्र भिसे, वर्षा कुलकर्णी, कक्षसेवक संदीप बामने यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ.सचिन आंधळकर, डॉ.महेश माने, डॉ.रामेश्वर आवाड यांचीही उपस्थिती होती. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या डॉ.उज्वला गावडे, संदीप साऊत, बाळासाहेब खळगे यांनीही शस्त्रक्रियासाठी नियोजन केले.

Web Title: First successful surgery for mucormycosis on a woman with corona disease at Beed District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.