पहिल्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:44+5:302021-05-05T04:54:44+5:30

तलवाडा : पतीने दुसरे लग्न केले, पण तो हयात असेपर्यंत पहिल्या पत्नीला दुसरे लग्न करता येत नसल्याने, तिने आपल्या ...

The first wife removed the thorn with the help of her boyfriend | पहिल्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा

पहिल्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा

Next

तलवाडा : पतीने दुसरे लग्न केले, पण तो हयात असेपर्यंत पहिल्या पत्नीला दुसरे लग्न करता येत नसल्याने, तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला. ही घटना गेवराई तालुक्यातील राजापूर शिवारात घडली होती. या प्रकरणी पोलीस तपासात ही घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यांतर्गत राजापूर शिवारात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह १ मे रोजी आढळला होता, परंतु मयताच्या तोंडावर व गळ्यावर व्रण असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे हलविल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. गोळेगाव (ता.गेवराई) येथे भटक्या गोसावी समाजाची काही कुटुंब पाल ठोकून वास्तव्यास आहेत. त्यातीलच ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (वय ३५) याचा मृतदेह राजापूर शिवारातील एका शेतात आढळून आला होता. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी केला. यात मयत तरुणाचे पहिले लग्न झालेले असताना, त्याने दुसरे लग्न केले होते. गोसावी समाजातील प्रथेनुसार पहिला पती हयात असताना महिलेला दुसरे लग्न करता येत नाही. म्हणून मयताची पहिली छाया ज्ञानेश्वर चव्हाण ही अस्वस्थ होती. तिचे अन्य एका इसमाशी प्रेम संबंध जुळले होते. मात्र, पहिला पती हा तिच्या लग्नातला अडथळा ठरत होता. म्हणून तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तलवाडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या खुनाच्या प्रकरणाचा उलगडा केला असून, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नाना अप्पा शिंदे (रा गोळेगाव) व छाया ज्ञानेश्वर चव्हाण या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे व पोलीस नाईक वाडकर, पोलीस नाईक खाडे यांनी केला.

तीन दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणातील आरोपी नाना अप्पा शिंदे व छाया ज्ञानेश्वर चव्हाण या दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्या तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: The first wife removed the thorn with the help of her boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.