पहिल्याच वर्षी सामाजिक उपक्रमातून युवा गणेश मंडळाने मिळविली दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:39 AM2021-09-17T04:39:58+5:302021-09-17T04:39:58+5:30
शहरातील सरस्वती काॅलनी येथील युवा गणेश मंडळाचे हे पहिलेच वर्ष आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून बुधवारी रक्तदान शिबिरात ५१ ...
शहरातील सरस्वती काॅलनी येथील युवा गणेश मंडळाचे हे पहिलेच वर्ष आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून बुधवारी रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. तसेच मधुमेह तपासणी शिबिरात तब्बल ३०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धेसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यावेळी युवा गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज आर्दड, स्वप्निल सुतार, सचिव अरबाज शेख तसेच मंडळाचे मार्गदर्शक स्वप्निल कांडेकर, सत्यम पघळ, राम शिंदे, अभिजीत राठोड, रणवीर शिंदे, राज आरसुळ, शुभम पघळ, मयूर गव्हाणे, प्रतीक कुडके, रोहित राठोड, प्रफुल्ल कोकणे, सनी कांडेकर, सुबोध घोलप, फैजान शेख, अभी भारती, सचिन पवार, ऋषी पालमपल्ले व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच इतर गणेशभक्त उपस्थित होते.
160921\sakharam shinde_img-20210915-wa0037_14.jpg