एसीबीच्या जाळ्यात ‘मासा’ गळाला ! १० हजारांची लाच घेताना मत्स्य विकास अधिकारी तुंबारे चतुर्भुज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 06:41 PM2017-11-23T18:41:22+5:302017-11-23T19:08:59+5:30

मत्स्य व्यवसायायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला.

Fisheries Development Officer Tumbare arrested while taking a bribe of 10 thousand | एसीबीच्या जाळ्यात ‘मासा’ गळाला ! १० हजारांची लाच घेताना मत्स्य विकास अधिकारी तुंबारे चतुर्भुज

एसीबीच्या जाळ्यात ‘मासा’ गळाला ! १० हजारांची लाच घेताना मत्स्य विकास अधिकारी तुंबारे चतुर्भुज

googlenewsNext
ठळक मुद्देगेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथील शहादत मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्या, बंगाली पिंपळगाव या संस्थेला तलावाचा ठेका देण्यासाठी मागण्यात आली लाच एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या या बड्या माशाकडे सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त  पदभार होता.

बीड : मत्स्य व्यवसायायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला. आज दुपारी तीन वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही कारवाई करण्यात आली.

गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथील शहादत मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्या, बंगाली पिंपळगाव या संस्थेला तलावाचा ठेका देण्यासाठी संबंधित तक्रारदार हा नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रे घेऊन तुंबारेकडे रोज खेटे मारत होता. परंतु तो आज-उद्या करून चालढकल करीत असे. त्यानंतर त्याने ठेका आदेश देण्यासाठी २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. याची खात्री एसीबीकडून करण्यात आली.

यानंतर आज दुपारी तुंबारेने तक्रारदाराला १० हजार रूपये लाचेची मागणी केली व इच्छित स्थळी बोलावून ती स्वीकारली. याचेवळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचा-यांनी त्याला झडप घालून पकडले. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्रीकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, श्रीराम खटावकर, विकास मुंडे, सुशांत सुतळे, राकेश ठाकुर, सय्यद नदीम आदींनी केली.

भर उन्हात तक्रारदारच्या प्रतीक्षेत
तुंबारे हा वर्ग दोनचा अधिकारी आहे. शर्टिंग, बुट असा टापटीप होऊन त्याने तक्रारदाराला तात्काळ शिवाजी चौकात पैसे घेऊन बोलविले. एसीबीने त्याप्रमाणे ‘जाळे’ टाकले होते. बसस्थानकाच्या बाजूने जाणा-या नवीन झालेल्या सिमेंट रस्त्यावर तो तक्रारदारची भर उन्हात प्रतीक्षा करीत होता. तक्रारदाराकडून लाच स्वरूपात दहा हजार रूपये स्विकारताच एसीबीने टाकलेल्या जाळ्यात तो अलगद पडला. या बड्या ‘माशाने’ यापुर्वीही अनेकांकडून लाच स्वरूपात लाच स्वीकारल्याचे बोलले जात आहे. परंतु केवळ तक्रार नसल्याने तो यामध्ये यशस्वी झाला. अखेर गुरुवारी हा मासा जाळ्यात अडकला.

सहायक्त पदाचा पदभारही तुंबारेकडेच
एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या या बड्या माशाकडे सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त  पदभार होता. त्यामुळे कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे छोटे-मोठे काम असले तरी हा तुंबारे त्यांच्याकडून लाचेची मागणी करीत असे, असे समजते. त्याच्या लाचखोरीला मत्स्य व्यवसायीक आणि ठेकेदार वैतागले होते.

Web Title: Fisheries Development Officer Tumbare arrested while taking a bribe of 10 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड