पाच कोरोना बळी; १४७० नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:42 AM2021-04-30T04:42:58+5:302021-04-30T04:42:58+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा उच्चांक पार केला. गुरुवारी तब्बल १४७० नवे रुग्ण आढळून आले. तसेच ५ ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा उच्चांक पार केला. गुरुवारी तब्बल १४७० नवे रुग्ण आढळून आले. तसेच ५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली, तर १०२६ जणांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात बुधवारी ४९०२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यात ३ हजार ४३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १ हजार ४७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात २२५, आष्टी १३३, बीड ३२९, धारुर ८४, गेवराई २००, केज १३१, माजलगाव ५२, परळी ११९, पाटोदा ७५, शिरुर ८५ व वडवणी तालुक्यात ५६ नवे रुग्ण आढळून आले. गुरुवारी १०२६ जणांनी कोरोनावर मात केली.
दरम्यान, ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी आरोग्य विभागाच्या आयसीएमआर पोर्टलवर करण्यात आली. यात शिंदेवाडी (ता. माजलगाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, काडीवडगाव (ता. वडवणी) येथील ६५ वर्षीय महिला, सावरगाव (ता. माजलगाव) येथील ८३ वर्षीय महिला, नांदूरघाट (ता. केज) येथील ४९ वर्षीय पुरुष व घाटसावळी (ता. बीड) येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ४९२ इतकी झाली आहे. पैकी ४५ हजार ६३० कोरोनामुक्त झाले असून ८८९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती जि. प.चे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.