पाच जिल्ह्यांसाठी आजपासून सैन्यभरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:08 AM2020-02-04T00:08:08+5:302020-02-04T00:09:43+5:30
भारतीय सैन्य दलाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून सैन्यदल भरतीला सुरुवात होणार आहे. बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
बीड : भारतीय सैन्य दलाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून सैन्यदल भरतीला सुरुवात होणार आहे. बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत भरती कार्यक्रम राहील.
ही भरती प्रक्रि या पूर्णपणे गुणवत्तेनुसार असून युवकांनी भरतीचे प्रलोभन व फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. शहरातील नगर रोडवरील म्हसोबा फाट्याजवळ फार्मसी कॉलेजच्या मागे सैनिकी शाळेत ही भरती प्रकिया होणार आहे.
उमेदवारांनी दक्षता घ्यावी
सैन्य भरतीसाठी येणाºया प्रत्येक पात्र उमेदवाराने त्याच्या निश्चित भरती दिनांक व वेळेत प्रत्यक्ष भरतीच्या ठिकाणी पोहोचणे गरजेचे आहे. नातेवाईकांना आणावयाचे टाळावे. सूचनांनुसार प्रतिज्ञापत्रे, शपथपत्रे आदी कागदपत्रे घेऊन यावीत, यामध्ये पूर्वी सैन्यभरती प्रक्रियेमध्ये सहभागी झाले असल्यास त्याचा संपूर्ण तपशिलाचा लेखी मजकूर असावा. पात्र उमेदवाराने भरतीसाठी येताना सोबतच्या बॅगच्या ओळखीसाठी नावाचिन्ह लावावे. आपली आणलेली कागदपत्रे सुरिक्षतरित्या ठेवावी. लेखी व शारिरीक क्षमता परिक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास, अपात्र ठरल्यास कोणत्याही प्रकारे विनंत्या करु नयेत त्याचा उपयोग होत नाही. सोईच्या दृष्टीने कपडे, पांघरुण, खाद्यपदार्थ सोबत आणावे.
तीन पदांकरिता भरती प्रक्रिया
सैन्यदल भरतीसाठी आॅनलाईन पद्धतीने ६ डिसेंबर ते १९ जानेवारीपर्यंत नोंदणी केलेले उमेदवार पात्र आहेत.
भरतीमध्ये बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहतील.
सैन्यदलासाठी सैनिक (सामान्य वर्ग), सैनिक (तांत्रिक) आणि सैनिक (ट्रेडमैन) या पदांकरीता भरती केली जात आहे.
कर्नल दीनानाथ सिंग, भारतीय सैन्यभरती कार्यालय, दक्षिण कमांड, पूणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया होणार आहे.