उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:41+5:302021-09-02T05:11:41+5:30

वडवणी : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प पूर्ण ...

The five doors of the upper coil medium project opened | उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

googlenewsNext

वडवणी : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. यामुळे १०० टक्के पाणीसाठा आरक्षित ठेवून प्रकल्पाचे पाच दरवाजे मंगळवारी पहाटेच्या सुमारास ८० सेंटिमीटरने उघडून कुंडलिका नदीपात्रात १२ हजार ८५७ क्युसेकने पाणी सोडले. दरम्यान, नदीकाठी असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार प्रकाश सिरसेवाड यांनी दिली.

सध्या तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच लघू, मध्यम प्रकल्प, नदी, नाले, विहीरी, तलाव भरत आले आहेत. अनेक ओसंडून वाहत आहेत. परिणामी सतत पडणाऱ्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनही योग्य ती दक्षता व खबरदारी घेत आहे. वडवणी तालुक्यातील मुख्य मध्यम जलप्रकल्प असणाऱ्या सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पामध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला असून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील सोन्नाखोटा या ठिकाणी कुंडलिका नदीच्या पात्रात डोंगरपट्ट्यातील पाणी अडविण्यासाठी १८.७७ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा प्रकल्प २०१६ साला कार्यान्वित झालेला आहे. दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने तालुक्यातील तलाव, धरण नदी नाले बंधारे तुडुंब होत आहेत.

....

कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे गुरुवारी रात्री उघडले आहेत. प्रकल्पात १०० टक्के पाणी साठा आरक्षित ठेवून १२ हजार ८५७ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. तरी नदीकाठच्या गावातील जनतेने सतर्कता बाळगावी.

-यू. व्ही. वानखडे, कार्यकारी अभियंता, बीड पाटबंधारे विभाग.

310821\rameswar lange_img-20210831-wa0016_14.jpg~310821\rameswar lange_img-20210831-wa0012_14.jpg

उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

Web Title: The five doors of the upper coil medium project opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.