कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला पाच हजार लग्नांचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:34 AM2021-04-22T04:34:21+5:302021-04-22T04:34:21+5:30
----- बोटावर मोजण्याइतकेच विवाह एक वर्षापासून आमच्या मंगल कार्यालयात बोटावर मोजण्याइतके विवाह सोहळे झाले. लग्न सोहळ्यास ५० व्यक्तीपर्यंत उपस्थितीला ...
-----
बोटावर मोजण्याइतकेच विवाह
एक वर्षापासून आमच्या मंगल कार्यालयात बोटावर मोजण्याइतके विवाह सोहळे झाले. लग्न सोहळ्यास ५० व्यक्तीपर्यंत उपस्थितीला शासनाची परवानगी असल्याने लग्नासाठी मंगल कार्यालय घेण्याचे यजमानांनी टाळले. कोरोनामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मालकीचे असणाऱ्यांचा खर्च वाचला परंतु किरायाने मंगल कार्यालय चालविणाऱ्यांना भाडे द्यावे लागत आहे. लाईट बिल भरावे लागत आहे. - रवींद्र शिवणीकर, मंगल कार्यालय चालक
-----------------
मोठे नुकसान
एक वर्षापासून मंगलकार्यालय चालक, मालकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आमचे मंगल कार्यालय साडेतीन महिने कोविड केअर सेंटरसाठी दिले तर सर्वांच्या सहकार्याने गरजूंना अन्नदान करण्यासाठी ७ महिने येथील स्वयंपाकघराचा वापर झाला. वीजबिल मोठे आले. शासनाकडून कसलीही मदत मिळाली नाही. त्यानंतर कार्यालयातील पडदे बदलले, स्वच्छता, रंगरंगोटीवर खर्च केला. वर्षभरात केवळ एक लग्न झाले. हे नुकसान लवकर भरून येण्यासारखी नाही. - संतोष सोहनी, मंगल कार्यालय मालक
------
बीड शहरात ३० तर जिल्ह्यात लहान मोठे मिळून खासगी व सार्वजनिक असे जवळपास २५० मंगल कार्यालये आहेत.
----------
लग्न हौसेने करायचे होते पण
एकुलता एक मुलगा, मुलगी, रेशीमगाठी जुळाल्याने वेळेत लग्न करायचे तसेच घरच्या सधन परिस्थितीमुळे सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्टांना निमंत्रण देऊन थाटात लग्न करायची इच्छा असताना कोरोनामुळे अवघ्या २१ लोकांच्या उपस्थितीत घरीच लग्न करण्याची वेळ अनेकांवर आली.
-----------
गुन्हे दाखल
शासनाचे आदेश असताना लग्न सोहळ्यास गर्दी जमवून नियमांचे भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात काही ठिकाणी वर, वधू, त्यांचे वडील मामा, नातेवाईकांसह मंगल कार्यालय, पुराेहितांवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे अनेकांनी गर्दीचा सोहळा टाळून ३१ किंवा ५१ लोकांच्या उपस्थिती लग्न उरकले.
---------
वर्षभरात ८० लग्न रजिस्टर्ड
जिल्ह्यात एक वर्षात ८० लग्न रजिस्टर्ड पद्धतीने झाले. नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांना एक महिना आधी अर्ज दाखल करावा लागतो. त्यानंतर नोटीस व नियमानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. विवाह अधिकारी म्हणून एस. ए. पोकळे काम पाहतात.- नितीन चाटेकर आयटी. असिस्टंट. , विवाह नोंदणी कार्यालय.
-----------
वर्षभरात ६१ लग्नतिथी
पंचांगात दर्शविल्याने एप्रिल ते जुलैपर्यंत व त्यानंतर नोव्हेंबर ते मार्चपर्यंत वर्षभरात ६१ लग्नतिथी आहेत. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने व निर्बंध कठोर केले जात असल्याने मुला-मुलींच्या लग्नाची चिंता पालकांना सतावत आहे. तर लवकरच परिस्थती सुधारेल, निर्बंध सैल होतील, या आशेने लग्नाचा बेत पुढे ढकलला आहे.
---------