प्लास्टिक वापरल्याप्रकरणी परळीत पाच व्यापाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:20 AM2018-10-17T00:20:37+5:302018-10-17T00:22:41+5:30
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घाततेली असतानाही परळीतील काही व्यापा-यांकडून या नियमांचे उल्लंघन करुन प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून येथील पाच व्यापा-यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण पथक व परळी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घाततेली असतानाही परळीतील काही व्यापा-यांकडून या नियमांचे उल्लंघन करुन प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून येथील पाच व्यापा-यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण पथक व परळी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. पाच व्यापा-यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिक वापरावर शासनाने नुकतीच बंदी घातलेली आहे. बंदी असतानाही काही व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्रीय अधिकारी मातेकर व परळी पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी शहरातील काही दुकानांची तपासणी केली असता परळीतील मधुसूदन ड्रेसेस, गुरुकृपा ट्रेडर्स, गणेश प्रोव्हीजन, परिवार प्रोव्हीजन, पार्श्वनाथ ट्रेडर्स हे पाच व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले.
शासनाच्या नियमानुसार या व्यापाºयांवर कार्यवाही करण्यात येवून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही कार्यवाही आता नियमित चालू राहणार असून परळीतील व्यापाºयांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु नये अन्यथा अशा प्रकारची दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी म्हटले आहे.
या पथकात परळी न.प.चे कार्यालयीन अधीक्षक दिलीप रोडे, स्वच्छता निरीक्षक संजय जुजगर, किरण उपाडे, व्ही.बी.दुबे, एम.आर.घुगे, एस.पी. डहाळे, अशोक दहीवडे विकास जगतकर, विलास केदारी, राजाभाऊ जगतकर, रमेश सवादे, कुलकर्णी, विकास मुंडे, शरनम ताटे व इतर कर्मचारी सहभागी
होते.