खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:40 AM2021-02-17T04:40:13+5:302021-02-17T04:40:13+5:30
बीड : मागील १५ दिवसांपासून केज तालुक्यातील शेतकऱ्यांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांमार्फत कृषिपंपाची थकीत वीज बिल वसुली सक्तीने चालू ...
बीड : मागील १५ दिवसांपासून केज तालुक्यातील शेतकऱ्यांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांमार्फत कृषिपंपाची थकीत वीज बिल वसुली सक्तीने चालू आहे. अचानकपणे कुठल्याही प्रकारची नोटीस न देता महावितरणने थकीत कृषिपंपाची वीज कनेक्शन तोडली असल्याने शेतकऱ्यांची पिके वाळून जात आहेत. कुठल्याही प्रकारची सूचना अथवा लेखी नोटीस न देता बेकायदेशीरपणे वीज कनेक्शन तोडणे ही बाब शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे.
या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, युवा शेतकरी नेते फेरोज खान पठाण, शाखाध्यक्ष सुग्रीव करपे यांनी आज १६ फेब्रुवारी रोजी उपकार्यकारी अभियंता, केज यांना लेखी निवेदन दिले. सध्या चालू असलेली सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी व खंडित केलेले वीज कनेक्शन तत्काळ पूर्ववत करावीत. अन्यथा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. या आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.