बीडच्या भूमिपुत्राचा अमेरिकेत झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:34+5:302021-05-20T04:36:34+5:30
बीड : मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर परीक्षेत येथील प्रतीक पारस संचेती याने ४०० पैकी ३९४ गुण प्राप्त करून घवघवीत यश ...
बीड : मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर परीक्षेत येथील प्रतीक पारस संचेती याने ४०० पैकी ३९४ गुण प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम श्रेणीत पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याला गुणवत्तेच्या आधारावर अमेरिकेतील क्लेव्हलँड स्टेट या विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. अभ्यासूवृत्ती, जिद्द , निश्चित ध्येय आणि कुटुंबीयांचे पाठबळ याच्या आधारावर त्याने अतिशय उच्चतम गुण प्राप्त करून हे यश मिळविले. नववीत असतानाच इंजिनिअरिंगमधील उच्च शिक्षण आणि तेही परदेशात घ्यायचे याची मनाशी खूणगाठ बांधूनच अभ्यासाकडे अधिक लक्ष दिले, संबंधित विषयातील मूलभूत संकल्पना समजावून घेत गेलो. याशिवाय आई-वडिलांनी कायम शैक्षणिक वातावरण तयार करत भक्कम पाठबळ दिले. कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईकांनी प्रोत्साहित केले. पुण्याचे प्रफल्ल शिंगवी, वडिलांच्या वर्गभगिनी तारा मंत्री व क्लेव्हलँड स्टेटमधील काबरा यांचे मोलाचे सहकार्य राहिले. शिक्षक व प्राध्यापक यांचे अचूक मार्गदर्शन आणि वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे हे यश मिळाल्याचे प्रतीकने सांगितले.
===Photopath===
190521\19bed_13_19052021_14.jpg