केज तालुक्यातील सर्व नद्यांना पूर; पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:37 AM2021-09-27T04:37:30+5:302021-09-27T04:37:30+5:30

केज : शनिवारी रात्री व रविवारी दुपारी झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आला असून शेतीचे मोठ्या ...

Flood all rivers in Cage taluka; Crops in water | केज तालुक्यातील सर्व नद्यांना पूर; पिके पाण्यात

केज तालुक्यातील सर्व नद्यांना पूर; पिके पाण्यात

Next

केज : शनिवारी रात्री व रविवारी दुपारी झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मस्साजोगजवळील आरणगाव येथील बोभाटी नदीवरचा पूल खचल्यामुळे काळेगाव ते आरणगाव या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.

तालुक्यातील बोभाटी, केजडी, होळना, मांजरा या नद्यांना पूर आलेला असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येळंब घाट, सारणी-सांगवी, मसाजोग, कोरेगाव, हादगाव डोका, शेलगाव-गांजी, युसुफ वडगाव येथून वाहणाऱ्या नद्यांना पूर आल्याने, शेतात कापणी करून ठेवलेले सोयाबीन तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. मांजरा प्रकल्प, सारणी-सांगवी साठवण तलाव, जाधव जवळा येथील साठवण तलाव व सर्व मध्यम व लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. आरणगाव ते काळेगावदरम्यानचा संपर्क तुटल्याची माहिती मिळताच तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसीलदार लक्ष्मण धस, जि. प. उपाध्यक्ष यांनी आरणगाव येथे जाऊन पाहणी केली. जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, भाजपा नेते अक्षय मुंदडा यांनीही नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत.

260921\198-img-20210926-wa0013.jpg~260921\1910-img-20210926-wa0017.jpg

केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील काढणीला आलेले पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.~अतिवृष्टीमुळे मांजरा नदी काठच्या शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्याचे काढून ठेवलेले सोयाबीन ही वाहून गेले आहे. मांजरा नदी काठच्या शेतात अशा प्रकारे पाणीच पाणी झाले होते.

Web Title: Flood all rivers in Cage taluka; Crops in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.