परळीत सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले; साखर झोपेतील नागरिकांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 01:18 PM2024-09-03T13:18:50+5:302024-09-03T13:19:27+5:30

जवळपास १००० कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. 

Flood waters of Saraswati river entered many parts of Parli; Citizens who are in sugar sleep are uprooted | परळीत सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले; साखर झोपेतील नागरिकांची उडाली तारांबळ

परळीत सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले; साखर झोपेतील नागरिकांची उडाली तारांबळ

- संजय खाकरे
परळी:
गेल्या दोन दिवसापासून संततधार व मुसळधार पाऊस चालू असल्याने . सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या पात्राला पूर आला आहे. या नदीचे पाणी आंबेवेस भागातील पुलावरून वाहू लागले. हे पाणी शहरातील बरकत नगर, इंदिरानगर, भिमानगर , कृष्णा नगर, गोपाल टॉकीज रोड,आंबेवेस , रहेमत नगर, गंगासागर नगर, कुरेशी नगर, भुई गल्ली, सिद्धार्थ नगर, सर्वे नंबर ७५ मधील घरात आज मंगळवारी पहाटे ५ वाजता  पाणी शिरले आहे.

जवळपास १००० कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या भागातील घरात चार फूट पाणी साचले. अनेकांच्या घरात चिखल झाला आहे.यामुळे या भागात हाहाकार माजला. पहाटे साडेपाच वाजता परळी चे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, नगरपालिका मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे , अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन स्वच्छता  विभागाचे शंकर साळवे, सुनील आदोडे यांनी भेट देवून पाहणी केली . व मदत कार्य केले. नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. नाल्यात साचलेला कचरा काढण्यासाठी जेसीबीच्या दोन मशीन लावण्यात आल्या आहेत. 

सकाळी ११ वाजेपर्यंत प्रशासनातील अधिकारी थांबून नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या व  नगरपालिकेने नऊ ठिकाणी राहण्याची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली आहे. तसेच या भागात प्रा टीपी मुंडे, माजी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, आयुब पठाण, इस्माईल पटेल , माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, अॅड. जीवनराव देशमुख, देवराव लुगडे, सुरेश नानावटे यांनी भेटी देऊन मदत कार्य केले.

मुसळधार पावसामुळे परळीतील सरस्वती नदीच्या पात्रात पूर आल्याने १००० कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने तातडीने भेट देऊन या भागातील नागरिकांना नऊ ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले तसेच या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी एक पथक नेमण्यात आले या पथकात तलाठी नगरपालिका कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी असतील अशी माहिती परळी उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली. 

परळी नगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे असे परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी सांगितले. पूरग्रस्त भागातील लोकांना निवाऱ्याची सोय परळीतील  शाही फंक्शन हॉल बरकत नगर ,मिलिया स्कूल, बागवान शादी खाना, जिल्हा परिषद शाळा बरकत नगर ,समाज मंदिर ,भीमानगर , झमझम पार्क इर्शाद नगर, कुरेशी शादी खाना या ठिकाणी करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली प्रा टीपी मुंडे, प्रा विजय मुंडे, प्रदीप मुंडे भीमराव मुंडे व इतर कार्यकर्त्यांनी भेट देऊन त्या लोकांच्या खिचडीची सोय केली. 

बरकत नगर भागात अनेकांच्या घरात पहाटे पाच वाजता पाणी घुसले हे समजताच आपण तिथे गेलो. तेथील लोकांना एका हॉलमध्ये थांबण्याची विनंती केली व त्या ठिकाणी काही लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. 
- आयुब पठाण, माजी उपनगराध्यक्ष 

कृष्णा नगर, गंगासागर नगर , बरकत नगर  या भागातील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने दानादान उडाली. नुकसानग्रस्त भागातील लोकांसाठी सकाळी त नाष्ट्याची सोय करण्यात आली ,घरपोच नाष्टा देण्यात आला व या ठिकाणी स्टॉल लावून नाश्त्याची सोय केली.
- दीपक देशमुख, माजी नगराध्यक्ष 

Web Title: Flood waters of Saraswati river entered many parts of Parli; Citizens who are in sugar sleep are uprooted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.