पिकांसह फुलवले फुलांचे उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:26+5:302021-03-19T04:32:26+5:30
अंबाजोगाई : महाविद्यालयात उत्तम शिक्षण घ्यावयाचे असेल, तर तेथील परिसरही स्वच्छ व सुंदर असला पाहिजे. येथील शासकीय कृषी महाविद्यालय ...
अंबाजोगाई : महाविद्यालयात उत्तम शिक्षण घ्यावयाचे असेल, तर तेथील परिसरही स्वच्छ व सुंदर असला पाहिजे. येथील शासकीय कृषी महाविद्यालय प्रशासनाने हेच लक्षात घेऊन विद्यार्थी व सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने परिसरात फुलांचे उद्यान फुलविले आहे. याच परिसरात आनंद घनवन लागवड केल्याने पूर्वीच्या रुक्ष शिवारावर आता हिरवाईची झालर पसरली आहे.
शहराच्या पश्चिमेला बीडरोड लगतच कृषी महाविद्यालयाचा शंभर एकरच्या परिसरात कंपनी बाग, कृषी विद्यालय व सीताफळ संशोधन केंद्र आहे. लगतच्या मोरेवाडीजवळ निजामकालीन तलाव आणि त्याखाली बडा हनुमान मंदिराजवळ दुसरा तलाव आहे. या तलावामुळे कंपनी बागेतील विहिरींना मुबलक पाणी असते. त्यावरच कृषी महाविद्यालय परिसरातील शेतीचे सिंचन होते. परंतु उन्हाळ्यात मात्र या पाण्याचा हवा तेवढा वापर होत नसल्याने हा परिसर रुक्ष दिसायचा.
या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी मागील वर्षी पदभार घेतला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून त्यांनी या परिसराला आकार दिला. शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनानुसार हे काम सुरू केले.
या उद्यानामुळे महाविद्यालयाच्या परिसराला पर्यटनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे याला भेटी देणारांचीही संख्या वाढू लागली आहे. विद्यार्थी, शेतकरी व पशुपालक हे केंद्रबिंदू धरून कृषीचे अद्ययावत शिक्षण, बिजोत्पादन, अनुभवातून शिक्षण तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, देशी गोवंश संवर्धन, देशी वृक्षलागवड, उत्पादन, कृषी पर्यटन विकासाला चालना देणे यावर भर देण्यात येणार असल्याचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले. योगदानामुळे शक्य या कामासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून पुढे आले. उद्यान विद्या प्रभारी प्रा. डॉ. अरुण कदम, डॉ. बसलिंगआप्पा कलालबंडी, डाॅ. प्रताप नाळवंडीकर, डाॅ. दीपक लोखंडे यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे योगदान असते.
चार हजार झाडांची लागवड
या परिसरातील फक्त दहा गुंठे क्षेत्रात त्यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने 'आनंद घनवन ' फुलविले. सध्या ही झाडे आठ ते दहा फुट उंचीची झाली आहेत. यातील वडांच्या झाडाला सध्या नवती फुटू लागल्याने ते आणखीनच मोहक दिसू लागली आहेत. यात विविध प्रजातींच्या चार हजार वृक्षवल्लींची लागवड केलेली आहे. फुलवर्गीय झाडांसह झुडूप वर्गीय झाडांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त जांभूळ, चिंच, वड, पिंपळ, करंज, उंबर, पिंपरी, कडुलिंब, गुलमोहर, आंबा आदी एक हजार वृक्षांची लागवड केली आहे. यापूर्वी लावलेली आंब्याचीही बाग येथे आहे.
गवताचे आच्छादन
गवताचा असाही वापर
या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत येत असते. ते कापून विक्री केले जायचे. परंतु यंदा या गवताची विक्री न करता, पूर्ण परिसरातील गवत कापून घेऊन ते एकत्रित साठवले. आता याच गवताचा झाडाच्या बुडाला अच्छादनासाठी वापर केला जात आहे. उन्हाळ्यात पाणी कमी लागावे व दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून पिकांचे गुणी व वाळलेल्या गवताचे अच्छादन (मल्चिंग) करण्यात आले आहे. ठिबक संचाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन केले आहे.
फुलणारी फुले, बागडणारे पक्षी
फुलांचे उद्यान
महाविद्यालयाच्या इमारतीसमोरच एक एकर क्षेत्रात मोगरा, गुलाब, निशिगंध अशा सुगंधी फुलांचे उद्यानही फुलविले आहे. हवेच्या तालावर याची फुलेही आता चांगलीच डोलू लागली आहेत. या आनंद घनवनामुळे आता पक्षांनीही रेलचेल सुरू झाली आहे. फुलांमुळे मधमाशांचेही प्रमाण वाढले आहे, त्यामुळे पराग सिंचन होऊन अन्नधान्याचे उत्पादन वाढीसाठी मदत होते.
===Photopath===
180321\18bed_7_18032021_14.jpg~180321\18bed_5_18032021_14.jpg~180321\18bed_6_18032021_14.jpg
===Caption===
अंबाजोगाई येथील शासकीय कृषी महाविद्यालयात शेतीसह बाग आणि घनवन फुलविण्यात आले आहे. बागेतील फुलझाडांवर पक्षीही बागडू लागले आहेत.~