फुल,घाट्याला आलेल्या हरभरा पिकाला मर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:31 AM2021-02-07T04:31:18+5:302021-02-07T04:31:18+5:30
शिरूर कासार : तालुक्यात यंदा हरभरा पेरा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. सुमारे तीन टप्प्यात हा पेरा ...
शिरूर कासार : तालुक्यात यंदा हरभरा पेरा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. सुमारे तीन टप्प्यात हा पेरा करण्यात अला. पहिला हरभरा काढला तर दुसरा पेरा आता काढणीला आला. मात्र तिसऱ्या टप्प्यातील हरभरा पीक हे फुलात ,घाट्यात असतांनाच त्याला मर सुरू झाली आहे. झाड जागेवर वाळून जाण्याचे प्रमाण मोठे असल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.उपलब्धतेमुळे पाणी वेळेवर रात्र -अपरात्री जागुन दिले. शिवाय दोन दोन वेळा औषधफवारणी देखील केली. पीक जोमात दिसत असतांना आणि ऐन फुल लगडत असताना व घाटे धरत असतानाच ही र सुरू झाली आहे. जागेवर झाड वाळून जात असल्याने शेतकरी भांबावला आहे. कृषी विभागाने दिलेले ट्रॅप लावले. सगळे सावधगिरीचे उपाय केले. मात्र नव्याने ही पीडा आल्याने उत्पादनात घाटा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.