चारा- पाणीप्रश्न गंभीर; ३६ चारा छावण्या पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:54 AM2019-07-28T00:54:18+5:302019-07-28T00:55:02+5:30
जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे मार्च ते जुन या महिन्यात जवळपास ६०३ चारा छावण्या कार्यरत होत्या, मधल्या काळात थोड्या प्रमाणात पाऊस झल्यामुळे बहुतांश चारा छावण्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आष्टी तालुक्यातून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी झाली याला देखील प्रशासनाने मान्यता दिली असून, जिल्ह्यात सद्य:स्थितीला ३६ चारा छावण्या सुरू आहेत.
बीड : जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे मार्च ते जुन या महिन्यात जवळपास ६०३ चारा छावण्या कार्यरत होत्या, मधल्या काळात थोड्या प्रमाणात पाऊस झल्यामुळे बहुतांश चारा छावण्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आष्टी तालुक्यातून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी झाली याला देखील प्रशासनाने मान्यता दिली असून, जिल्ह्यात सद्य:स्थितीला ३६ चारा छावण्या सुरू आहेत.
ऐन पावसाळ््यात खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाचा वतीने मार्च ते जुन हे तीन महिने दुष्काळी काळ ग्राह्य धरला जातो. मात्र, यावर्षी जून व जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे गरजेनुसार पुन्हा चारा छावण्या टँकर सुरु करण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आली होती. तसेच मागणीनूसार चारा छावण्यांना परवानगी देण्याचे आदेश देखील प्रशासनास दिले आहे. त्यानुसार आष्टी तालुक्यातून चारा छावणी सुरु करण्याची मागणी आली होती त्यानुसार चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत.
सद्य:स्थितीला ३६ चारा छावण्या कार्यरत असून त्यापैकी आष्टी तालुक्यात २८, बीडमध्ये १, वडवणी १ व गेवराई तालुक्यात ६ चारा छावण्या सुरु आहेत. यामध्ये जवळपास २२ हजार १६८ पशुधन आश्रयास असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऐन पावसाळ््यात शेतकऱ्यांवर जनावरं छावणीत नेण्याची वेळ आली तसेच पिकांची परिस्थिती देखील वाईट आहे. यामुळे बळीराजा नैराश्याच्या गर्तेत आल्याचे दिसून येत आहेत.
चारा छावण्याची देयके रखडली
चारा छावण्या सुरु असताना अनेक चारा छावण्यांमध्ये जनावरांच्या संख्येत तफावत आढळून आली होती. त्यामुळे देयके रोखण्यात आली आहेत. मात्र, सरसकट दंड न आकारता ज्यांनी योग्य अंमलबजावणी केली नाही त्यांच्यावरच दंड आकारावा, अशी मागणी छावणी चालाकांकडून करण्यात येत असून तात्काळ देयके अदा करण्याची मागणी होत आहे.