ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या वसतिगृहातील १९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 11:09 AM2024-12-09T11:09:42+5:302024-12-09T11:11:14+5:30

अंबाजोगाई तालुक्यातील घटना; सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती

food poisoning to 19 students in a hostel for children of sugarcane workers Ambajogai | ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या वसतिगृहातील १९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या वसतिगृहातील १९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

अंबाजोगाई ( बीड) : तालुक्यातील येलडा येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या हंगामी वसतिगृहातील १९विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

येलडा येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह आहे. यावर्षी काही दिवसांपूर्वीच हे वसतिगृह सुरू झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वसतिगृहातीलविद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. यात वांग्याची भाजी, भात, भाकरी असे पदार्थ होते. रात्ती 12 वाजताच्या नंतर यापैकी काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. वसतिगृह कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सध्या एकूण १९ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Web Title: food poisoning to 19 students in a hostel for children of sugarcane workers Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.