कोरोना योद्धांना अन्नधान्य, सुरक्षा किटची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:34 AM2021-05-12T04:34:24+5:302021-05-12T04:34:24+5:30
अंबेजोगाई : गेल्या दहा महिन्यांपासून मृत पावलेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या त्या कोरोना योद्ध्यांना येथील ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने अन्नधान्य व ...
अंबेजोगाई : गेल्या दहा महिन्यांपासून मृत पावलेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या त्या कोरोना योद्ध्यांना येथील ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने अन्नधान्य व सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
अंबेजोगाई नगरपरिषदेच्या वतीने मृत झालेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या दहा महिन्यांपासून या पथकातील कर्मचारी हे जोखमीचे काम मोठ्या मेहनतीने सेवाभाव समजून पार पाडत आहेत. दररोज किमान २० ते २५ जणांवर अंत्यसंस्कार होतात. या कामी पथकप्रमुख रणधीर सोनवणे, त्यांचे सहकारी बाबुराव आव्हाडे, लक्ष्मण जोगदंड, सुमेर काळे, बाबासाहेब आव्हाडे, मारुती चव्हाण, अनिकेत साठे, शेख रहीम, जावेद शेख ही टीम हे सेवाकार्य पार पाडत आहेत. या टीमला मदत म्हणून अन्नधान्य किट व त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर, हँडवॉश असे विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
===Photopath===
110521\avinash mudegaonkar_img-20210511-wa0058_14.jpg