मोरफळी शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे, वनविभागाच्या पाहणीतून सत्य आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 19:56 IST2023-03-16T19:56:26+5:302023-03-16T19:56:36+5:30
शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण; वनविभागाच्या पथकाने शिवारात येऊन ठसे तपासले

मोरफळी शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे, वनविभागाच्या पाहणीतून सत्य आले समोर
धारूर (बीड) : तालूक्यातील मोरफळी या डोंगराळ परिसरात आज सकाळी बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभागाच्या पथकाने ठस्यांची पाहणी केली.
मोरफळी शिवारात आज सकाळी देवराव भीमराव गडदे यांच्या शेतात ( गट नं 14,15 ) बिबटया सदृश्य प्राणी दिसून आला. यामुळे ग्रामस्थ, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी वन विभाग टोल फ्री नं 1926 वर संपर्क करून तक्रार करण्यात आली. त्यानंतर धारूर वन विभागाने शिवारात आढळून आलेल्या प्राण्याच्या पायाचे ठसे घेतले. चहूबाजूंनी परिसर पाहणी केली. दरम्यान, वनपरीक्षेञ अधिकारी यु. एच. चिकटे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर हे ठसे बिबट्याचे नसून दुसरा प्राणी असल्याचे स्पष्ट केले. तसेच भीती न बाळगता ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन चिकटे यांनी केले आहे.