गेवराईत कोरोना नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:33 AM2021-04-08T04:33:47+5:302021-04-08T04:33:47+5:30
गेवराई : बीड जिल्ह्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात अनेक निर्बंध लावले मात्र ...
गेवराई : बीड जिल्ह्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात अनेक निर्बंध लावले मात्र या नियमाचे शहरात कोठेच पालन होत नसल्याने चित्र दिसत आहे. बुधवारी शहरात विविध ठिकाणी भाजी, फळ विक्रेते सह विविध जण रस्त्यावरच बसल्याने ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच भाजी विक्रेते,फळ विक्रेते व ग्राहकांच्या तोंडाला मास्क व कसलाच अंतर दिसत नव्हता.
शहरात लाॅकडाऊनच्या नियमाची पायमल्ली झाल्याचे चित्र दिसत होते. याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असल्याने याला आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लावले. यात लाॅकडाऊनमुळे आठवडे बाजार बंद झाले असताना देखील बुधवारी शहरातील विविध ठिकाणी भाजी विक्रेते,फळ विक्रेते यांनी गल्लीबोळात तसेच मेन रोड,मोंढा नाका सह विविध ठिकाणच्या रस्त्यावरच ठाण मांडले होते. तसेच भाजी खरेदी साठी ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाजी, फळ विक्रेते तसेच ग्राहकांच्या तोंडाला मास्क नव्हता. तसेच सामाजिक अंतराचे भान कोणालाही नव्हते. त्यामुळे एकीकडे प्रशासन कडक निर्बंध करते, मात्र शहरात या नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. तसेच शहरात अनेक ठिकाणी दिवसभर नागरिकांची गर्दी दिसत होती. शहरात लाॅकडाऊन आहे का नाही असा प्रश्नही निर्माण होत आहे. याकडे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिवस भर शहरात दिसत होते.
गेवराई शहरातील मोंढा नाका येथे भाजी,फळविक्रेते व ग्राहकांची गर्दी झाली होती.
===Photopath===
070421\20210407_114420_14.jpg~070421\20210407_114313_14.jpg