बीडमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी १० हजारांची लाच घेताना अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:52 PM2018-01-05T18:52:14+5:302018-01-05T18:52:36+5:30
१० हजारांची लाच स्वीकारताना वनपरिश्रेत्र अधिकारी (फिरते पथक ) मानसिंग राजपूत यास लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुपारी १२.३० च्या सुमारास बसस्थानका समोरील हॉटेलमध्ये ही कारवाई झाली.
बीड : १० हजारांची लाच स्वीकारताना वनपरिश्रेत्र अधिकारी (फिरते पथक ) मानसिंग राजपूत यास लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुपारी १२.३० च्या सुमारास बसस्थानका समोरील हॉटेलमध्ये ही कारवाई झाली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दोषारोप पत्र न पाठविण्याच्या आणि २०१८ चा परवाना नुतनीकरण करून देण्यासाठी राजपूत याने मादळमोही (ता. गेवराई) येथील एका लाकूड कटाई मिलला १५ हजार रुपये मागितले होते. त्यापैकी ५ हजार रुपये आधीच स्वीकारले होते. आज उर्वरित रक्कम स्वीकारण्यासाठी त्याने तक्रारदारास बीड येथे बोलावले होते. यानुसार दुपारी बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये राजपूत यांस १० हजाराची लाच स्वीकारताना पोलिसांनी अटक केली.