माजी मंत्र्याची मुले, महाविद्यालये, बँका, उद्योजक अन् व्यापारी महावितरणचे बडे थकबाकीदार....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:34 AM2019-09-20T00:34:29+5:302019-09-20T00:35:07+5:30

महावितरणची १ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची यादी काढली असता यामध्ये माजी मंत्र्याची मुले, बँका, उद्योजक, व्यापारी आदींची नावे समोर आली आहेत.

Former Minister's children, colleges, banks, entrepreneurs and businessmen are the outstanding outstanding of Mahavira ... | माजी मंत्र्याची मुले, महाविद्यालये, बँका, उद्योजक अन् व्यापारी महावितरणचे बडे थकबाकीदार....

माजी मंत्र्याची मुले, महाविद्यालये, बँका, उद्योजक अन् व्यापारी महावितरणचे बडे थकबाकीदार....

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महावितरणची १ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची यादी काढली असता यामध्ये माजी मंत्र्याची मुले, बँका, उद्योजक, व्यापारी आदींची नावे समोर आली आहेत. या सर्वांची यादी तयार करून महावितरणने आता वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी ११६ ग्राहकांची वीज तोडली आहे. विशेष म्हणजे बड्या असलेल्या ६४६ ग्राहकांकडे तब्बल १४ कोटींची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती गुरूवारीसमोर आली आहे.
बीड जिल्ह्यात महावितरणचे जवळपास २ लाख ४० हजार ग्राहक आहेत. वीज वापर करूनही बिले भरण्यास ग्राहक उदासीन असल्याने थकबाकीचा आकडा अब्जावधीच्या घरात गेला आहे. हाच धागा पकडून महावितरणने आता कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. दोन टप्पे केले असून पहिल्या टप्प्यात एक लाखांपेक्षा जास्त आणि दुसऱ्या टप्प्यात ५० हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
घरगुती आणि व्यवसायासाठी वीज वापर करून बिले न भरणा-या ११६ ग्राहकांचा वीज पुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला. कारवाईची मोहीम हाती घेताच ६२ ग्राहकांनी तात्काळ महावितरणकडे धाव घेत थकबाकी भरल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, महावितरणकडून या कारवाईत किती सातत्य राहते आणि दुजाभाव न करता पारदर्शकपणे कारवाया करण्याचे आव्हान असणार आहे. सर्व थकबाकीदारांमध्ये धनदांडग्यांचा समावेश आहे. राजकीय दबाव, गुंडगिरी करून कारवाई करणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांर दबाव आणला जात असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. हे सर्व झुगारून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मंत्र्यांची महाविद्यालये, माजी मंत्र्यांच्या मुलांकडेही लाखोंची थकबाकी
महावितरणच्या बड्या थकबाकीदारांच्या यादीमध्ये माजी मंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे. तसेच काही शासकीय अधिका-यांचे क्वार्टर्सचाही समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: Former Minister's children, colleges, banks, entrepreneurs and businessmen are the outstanding outstanding of Mahavira ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.