बीडमध्ये दरोडा टाकण्याआधीच चौघांच्या हाती बेड्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:12 AM2018-07-16T01:12:30+5:302018-07-16T01:12:59+5:30

Four beggars in beta before throwing a robbery in Beed | बीडमध्ये दरोडा टाकण्याआधीच चौघांच्या हाती बेड्या !

बीडमध्ये दरोडा टाकण्याआधीच चौघांच्या हाती बेड्या !

Next

बीड : पोलीस रेकॉर्डवरील ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या मोस्ट वॉन्टेड आरोपीसह चौघांना दरोड्याच्या तयारीत असताना शहरातील नगरनाका परिसरातून गजाआड करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. चौघांकडून तीन मोटारसायकल, दोरीबंडल, ब्लेड, मिरचीपूड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

बीड शहरातील नगरनाका परिसरातून मोस्ट वॉन्टेड आरोपीसह चौघेजण दरोड्याच्या तयारीने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी तातडीने कर्मचाºयांना सापळा लावण्याच्या सूचना दिल्या. रात्री ११ वाजेच्या सुमारास नगरनाका परिसरात संतोष उत्तम गायकवाड (रा.केसापुरी कॅम्प), अमोल येल्लपा गायकवाड (रा.पिंपरगव्हाण, बीड), सुशील फकिरा गायकवाड (रा. पिंपरगव्हाण), गोविंद सर्जेराव जाधव (रा.तेलगाव) हे चौघे जण तीन मोटारसायकलवर दिसून आले. पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून चौघांना पकडले. यावेळी त्यांच्याकडे दोरीबंडल, ब्लेड, मिरचीपुड असे दरोड्याच्या तयारीतील साहित्य आढळून आले. पोलिसांनी मोटारसायकलसह सर्व साहित्य जप्त केले असून, चौघांनाही गजाआड करण्यात आले आहे. सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर. ए. सागडे, शेख सलीम, खेडकर, सय्यद शहेंशाह, तांबारे, गर्जे, देवकते यांनी केली.

दोन वर्षांसाठी संतोष गायकवाड हद्दपार
संतोष गायकवाड या अट्टल गुन्हेगारास दोन वर्षांसाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. हा आदेश डावलून तो बीडमध्ये आला होता. आपल्या साथीदारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच त्याच्या मुसक्या आवळल्या.

माजलगावात घातला धुमाकूळ
दोन महिन्यांपूर्वी माजलगाव शहरासह तालुक्यात गायकवाडच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. दररोज एक घरफोडी, दरोडा तालुक्यात पडत होता. अखेर सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्यानंतर माजलगावात चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटले.

एक दिवस पोलीस कोठडी
नगर नाक्यावर काही गुन्हेगार लपल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांना कल्पना देऊन तात्काळ सापळा लावला. यामध्ये चौघे अडकले. एक जण फरार झाला असला तरी लवकरच त्यालाही अटक करु. त्यांच्याकडून दुचाकी व इतर साहित्य जप्त केले आहे. एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
- आर. ए. सागडे, पोलीस उपनिरीक्षक, शिवाजीनगर ठाणे

Web Title: Four beggars in beta before throwing a robbery in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.