नकली सोने देणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 11:50 PM2019-12-03T23:50:40+5:302019-12-03T23:51:41+5:30
कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून शिवणकाम करणाºया महिलेस साडेपाच लाखाला गंडविल्याची घटना शहरातील जुन्या दवाखान्याच्या परिसरात सोमवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी तीन पुरुषांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज : कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून शिवणकाम करणाºया महिलेस साडेपाच लाखाला गंडविल्याची घटना शहरातील जुन्या दवाखान्याच्या परिसरात सोमवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी तीन पुरुषांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नेकनूर येथील विद्या गमे यांच्याकडे २८ नोव्हेंबर रोजी दुपारी एक राजस्थानी दाम्पत्य विद्या आले. त्यांनी त्यांच्याकडील चांदीचे आम्हाला नाणी व अर्धा किलोहून अधिक सोन्याच्या माळा सापडल्या आहेत. त्या कमी किमतीत देण्याचे आमिष दाखविले. विद्या गमे यांना खात्रीसाठी एक मणी दिला. पाच लाख रुपये देण्यासाठी त्यांनी दोन दिवसांची वेळ मागितली.
सोमवारी दुपारी विद्या गमे यांना सोने घेऊन जाण्यासाठी केजला बोलावले. त्यानंतर तिघांनी त्यांना उमरी रस्त्याजवळ नेले तेथे त्यांनी आणलेल्या सोन्याच्या मण्याच्या माळा काढून दाखवीत गमे यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले. सोने हे अर्धा किलोहून जास्त असल्याने बोरमाळीची मागणी करीत काढून घेतली. त्यानंतर रुपये व त्यांची दोन तोळ्यांची बोरमाळ घेऊन पसार झाले. त्यानंतर हे मणी नकली असल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गमे यांनी केज पोलीस ठाणे गाठले.
पो.नि. पुरुषोत्तम चोबे व इतरांनी माहिती ऐकून घेतली. सपोनि मारुती मुंडे व पो.ना. राणी मेंगडे यांना घटनास्थळी भेट दिल्यानंतर परिसरात सीसीटीव्ही नसल्याचे दिसून आले. विद्या गमे यांच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.