चार कोरोनाबळी; ८२ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:33+5:302021-08-29T04:32:33+5:30
जिल्ह्यात ४ हजार ४२० संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ४ हजार ३३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ८२ जणांचे ...
जिल्ह्यात ४ हजार ४२० संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ४ हजार ३३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात २, आष्टी २३, बीड १७,धारुर १, गेवराई ७, केज १२, माजलगाव २ परळी १, पाटोदा ६, शिरुरकासार १ व वडवणी तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे. दिवसभरात १०३ जण कोरोनामुक्त झाले. तसेच एका जुन्या मृत्यूसह २४ तासातील ४ मृत्यूंची नोंद झाली. २४ तासातील मृत्यूमध्ये ८५ वर्षीय महिला होळ (ता.केज), ६५ वर्षीय महिला सुरळेगाव (ता.केज), ७५ वर्षीय पुरुष येवता (ता.केज) व ६० वर्षीय पुरुष महिंदवाडी (ता.अंबाजोगाई) यांचा समावेश आहे. आता, एकूण बाधितांची संख्या आता १ लाख ९६३ झाली आहे. पैकी ९७ हजार २०५ कोरोनामुक्त झाले असून २ हजार ७०७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ५१ रुग्ण उपचाराखाली आहेत.