कोरोनामुळे चौघांचा मृत्यू, ८० नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:03 AM2021-03-04T05:03:19+5:302021-03-04T05:03:19+5:30
जिल्ह्यात बुधवारी चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. यात निपाणी जवळका (ता. गेवराई) येथील ७१ वर्षीय, ...
जिल्ह्यात बुधवारी चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. यात निपाणी जवळका (ता. गेवराई) येथील ७१ वर्षीय, तांबवा (ता. केज) येथील ७५ वर्षीय पुरुष, गुट्टेवाडी (ता. परळी) येथील ७३ वर्षीय पुरुष आणि शिरूरकासार येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच बुधवारी १०४५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ९६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ८० बाधित निष्पन्न झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ३७, अंबाजोगाई १५, आष्टी ८, धारूर ३, गेवराई २, केज २, माजलगाव ५, परळी ६ तसेच शिरूर व वडवणी तालुक्यात प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय ४० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १८ हजार ९६४ इतका झाला आहे. पैकी १८ हजार ४० जण कोरोनामुक्त झाले, तर ५८३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.