बीड पोलीस दलातील चार चेहरे चमकले; उपनिरीक्षक म्हणून निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:21+5:302021-02-16T04:34:21+5:30
पोलीस दलात कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत परीक्षा घेतली जाते. सप्टेंबर २०१७ सालीही अशीच परीक्षा घेण्यात आली. यात बीड जिल्ह्यातील ...
पोलीस दलात कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत परीक्षा घेतली जाते. सप्टेंबर २०१७ सालीही अशीच परीक्षा घेण्यात आली. यात बीड जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होेते. त्यानंतर डिसेंबर २०१७ साली मुख्य परीक्षा होऊन मार्च २०२० साली शारीरिक चाचणी घेण्यात आली. याचा निकाल नुकताच लागला असून, यात जिल्हा पोलीस दलातील चौघांनी यश संपादन केले. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील मनोज गदळे, अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यातील राहुल जाधव, स्थानिक गुन्हे शाखेतील संतोष काळे, मोटार वाहन विभागातील रामदास काळे यांचा समावेश आहे. या सर्वांचे पोलीस दलासह सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
मनोज गदळे राज्यात पाचवा
ही परीक्षा ४०० गुणांची होती. यात सर्वाधिक ३६१ गुण घेऊन मनोज गदळे यांनी राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ राहुल जाधव यांना ३४८, संतोष काळे यांना ३४१ तर रामदास काळे यांना ३३५ गुण मिळाले.