माजलगाव, अंबाजोगाई तालुक्यातील चार गुंड हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 05:58 PM2019-04-09T17:58:07+5:302019-04-09T17:59:25+5:30
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी दुपारी हे आदेश काढले.
बीड : माजलगाव व अंबाजोगाई तालुक्यात जुगाराचे गुन्हे करण्यासह तालुक्यात गुंडगिरी करणाऱ्या चौघांना बीड जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी दुपारी हे आदेश काढले.
अंबाजोगाई शहरात जुगार, दरोडा, जबरी चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे अशा स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या कमलाकर रमेश कुचेकर व विकास रमेश कुचेकर (दोघे रा. अंबाजोगाई) या भावंडांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव शहर ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक मारोती मुंडे यांनी अधीक्षकांकडे पाठविला होता. उपअधीक्षक सुरेश गायकवाड यांनी या प्रस्तावाची चौकशी करुन दोन वषार्साठी हद्दपार करण्याची शिफारस केली होती. अधीक्षकांनी त्यांना एक वषार्साठी हद्दपार केले.
माजलगाव शहर ठाण्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी मटका, जुगाराचे गुन्हे करणाऱ्या दोघांविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांनी या प्रस्तावाची चौकशी केली. त्यानंतर अधीक्षकांनी अनंत रामभाऊ शिंदे व रामेश्वर संतराम धारक (दोघे रा.माजलगाव) याांना जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले. लोकसभा निवडणुकीमुळे समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुध्द हद्दपारीच्या कारवायांनी सध्या वेग घेतला आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्याकडून सर्व ठाण्यांचा आढावा घेतला जात आहे.