चारचाकीची काच फोडून कापूस व्यापाऱ्याचे ९ लाख पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 07:27 PM2019-11-25T19:27:11+5:302019-11-25T19:48:40+5:30
या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गेवराई :- तालुक्यातील सिरसदेवी येथील एका कापूस व्यापाऱ्याच्या चारचाकीची काच फोडून तब्बल ९ लाख १५ हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.२५ ) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सिरसदेवी येथील कापसाचे व्यापारी बळीराम खरवडे यांनी शेतकऱ्यांना कापूस खरेदीचे पैसे देण्यासाठी बँकेतून ९ लाख १५ हजाराची रक्कम काढली. खरवडे यांनी पैस्यांची बॅग आपल्या चारचाकीत (एम.एच. २३ ए.डी ९००१ ) समोरील काचाजवळ ठेवली व गावाकडे निघाले. दरम्यान बीडरोडवरील एका जिनिंगजवळ गाडी उभी करत खरवडे कामानिमित्त आत गेले. काहीवेळानंतर ते बाहेर आले असता गाडीची काच फोडून पैस्यांची बॅग पळवल्याचे त्यांना दिसून आले. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली असून पुढील तपास सुरु आहे.