दुष्काळामुळे चाराप्रश्न गंभीर, पशुधन बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:27 AM2018-10-09T00:27:12+5:302018-10-09T00:28:00+5:30

यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे खरीप पिके हातची गेली आहेत. रब्बीची लागवड देखील होऊ शकत नाही. या कारणांमुळे शेतकरी चिंतेत असताना, आता शेतकऱ्यांसमोर जनावा-यांच्या चाºयाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

Fourfold severe due to drought, livestock markets | दुष्काळामुळे चाराप्रश्न गंभीर, पशुधन बाजारात

दुष्काळामुळे चाराप्रश्न गंभीर, पशुधन बाजारात

Next
ठळक मुद्देवैरण २३०० रुपयांवर : जनावरांच्या किमती झाल्या कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे खरीप पिके हातची गेली आहेत. रब्बीची लागवड देखील होऊ शकत नाही. या कारणांमुळे शेतकरी चिंतेत असताना, आता शेतकऱ्यांसमोर जनावा-यांच्या चाºयाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
पावसाअभावी हिरव्या चा-याची उपलब्धता कमी आहे. तसेच खरीप हंगामातील बाजरी, मका, कडवळाचा उतार कमी अल्यामुळे चाºयांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. जून, जुलै महिन्यात १००० ते १५०० रुपये शेकडा मिळणाºया वैरण पेंडीची किंमत २००० ते २३०० रुपये शेकडा इतकी झाली आहे. हा चारा देखील जवळपासच्या परिसरात विक्रीसाठी उपलब्ध नसल्यामुळे, भुसकट व उपलब्ध असणाºया कडब्यावर जनावरे जगवण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला देखील चाराटंचाईमुळे फटका बसला आहे. तसेच दुधाच्या किंमती घसरल्यामुळे विक्रीमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. शासनाने जरी दुधाला हमीभाव दिला असला तरी देखील तो शेतकºयांना न परवडणारा आहे. त्यामध्ये देखील २ रुपयांनी घट केली आहे. त्यामुळे दुधापासून मिळणारे पैसे जनावरांच्या खुराकाला देखील पुरत नाहीत, अशी प्रतिक्रिया नेकनूर येथील बाजारात शेतकºयांनी दिली.
नेकनूर येथे रविवारी जनावरांचा बाजार असतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आले होते. मात्र, जनावरे विकत घेणाºयांचा म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. मोठ्या जनावरांच्या किंमतीमध्ये देखील घट झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Web Title: Fourfold severe due to drought, livestock markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.