मुंबईच्या व्यापाऱ्याने केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:23+5:302021-03-31T04:34:23+5:30
बीड : गेवराई येथील व्यापाऱ्याकडून ८ टन मोसंबी व टरबूज मुंबई येथील मथुरा फुडस् अॅण्ड व्हेजिटेबल्स एजन्सीने मागितले ...
बीड : गेवराई येथील व्यापाऱ्याकडून ८ टन मोसंबी व टरबूज मुंबई येथील मथुरा फुडस् अॅण्ड व्हेजिटेबल्स एजन्सीने मागितले होते. मात्र तेथे गेल्यानंतर त्यांचे मोसंबी आणि टरबूज खरेदी न करता परत पाठविले. परत येण्याचा वाहतूक खर्चही दिला नाही. त्यामुळे व्यापाऱ्याचे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी तलवाडा पोलिसात मथुरा फ्रुट्रस ॲन्ड व्हेजीटेबल्स तेजपाल रोड विलेपार्ले मुंबई या एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गादास निवृत्ती अनभुले (रा. गेवराई) या व्यापाऱ्याने मोसंबी आणि टरबूज मुंबई येथील मथुरा फ्रुट्स अॅण्ड व्हेजीटेबल्स् या एजन्सीला पाठवले होते. मात्र त्या एजन्सीकडून सर्व माल मुंबई येथे गेल्यानंतर घेण्यास नकार दिला. तसेच अनभुनले यांचे वाहतूक भाडे देखील देण्यास नकार दिला. त्यामुळे मोसंबी आणि टरबूज परत आणावावे लागले. त्यामुळे संबंधित एजन्सीविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात कलम फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफो राठोड हे करत आहेत.