मानुरकर इंग्लिश स्कूलमध्ये मोफत कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:06+5:302021-05-21T04:35:06+5:30

तालुक्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा व संभाव्य त्रास टाळण्यासाठी मोफत कोविड केअर सेंटर हा उपक्रम गुरुवारी श्रीक्षेत्र मंच्छिंद्रनाथ देवस्थान ...

Free Covid Care Center at Manurkar English School | मानुरकर इंग्लिश स्कूलमध्ये मोफत कोविड केअर सेंटर

मानुरकर इंग्लिश स्कूलमध्ये मोफत कोविड केअर सेंटर

Next

तालुक्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा व संभाव्य त्रास टाळण्यासाठी मोफत कोविड केअर सेंटर हा उपक्रम गुरुवारी श्रीक्षेत्र मंच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव व आ.सुरेश धस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला. पन्नास रुग्ण क्षमतेचे हे सेंटर असून रुग्णांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

मानुरकर इंग्लिश स्कूलमध्ये नागनाथ देवस्थान मानूरचे मठाधिपती गुरू वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज, सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री, कानिफनाथ संस्थानचे श्रीरंग स्वामी महाराज यांचे हस्ते व जयदत्त धस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

माणसं जगली पाहिजेत, हाच एकमेव हेतू सर्वांनी ठेवला पाहिजे तसेच राजकीय ,सामाजिक व पारमार्थिक क्षेत्रातील सर्वांनी या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपली जबाबदारी म्हणून पुढे आले पाहिजे, असे मत जयदत्त धस यांनी व्यक्त केले. आलेले रुग्ण ठणठणीत बरे होवोत, असे आशीर्वाद तीनही महंतांनी दिले. आलेले हे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना केली.

कार्यक्रमास नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप, नायब तहसीलदार पालेवाड, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर खाडे, कृष्णा पानसंबळ, नगराध्यक्ष रोहिदास पाटील, मा.नगराध्यक्ष दत्ता पाटील, मा.उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा , डॉ.असो.चे अध्यक्ष डॉ.रमणलाल बडजाते , मा.सभापती निवृत्त बेदरे, व बबनराव चौधरी, डॉ .भगवान सानप ,सुरेश उगलमुगले, मा.नगरसेवक गणेश भांडेकर मा‌.नगरसेवक आनंद जावळे , फय्याज शेख , अशोक मोरे , कल्याण तांबे , बबन मोरे पाटील , रामनाथ कांबळे आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविक रोहिदास पाटील, सूत्रसंचालन मा.सभापती अरुण भालेराव व आभार मार्गदर्शन डॉ.बडजाते यांनी केले.

===Photopath===

200521\img20210520112712_14.jpg

Web Title: Free Covid Care Center at Manurkar English School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.