शिरूरमध्ये १०० बेडचे मोफत कोविड आयसोलेशन सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:33 AM2021-05-14T04:33:07+5:302021-05-14T04:33:07+5:30

शिरूर कासार : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता उद्रेक आणि त्यातून होणारा त्रास व पैशाची चिंता यातून मुक्तता व्हावी, ...

Free Covid Isolation Center with 100 beds started in Shirur | शिरूरमध्ये १०० बेडचे मोफत कोविड आयसोलेशन सेंटर सुरू

शिरूरमध्ये १०० बेडचे मोफत कोविड आयसोलेशन सेंटर सुरू

Next

शिरूर कासार : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता उद्रेक आणि त्यातून होणारा त्रास व पैशाची चिंता यातून मुक्तता व्हावी, यासाठी शिरूर येथे गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठान व शांतीवनच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोविड आयसोलेशन सेंटर बुधवारी सुरू करण्यात आले. शंभर रुग्ण क्षमतेच्या या सेंटरमध्ये वीस ऑक्सिजन बेडसुध्दा उपलब्ध केले जाणार आहेत.

माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. डाॅ. प्रीतम मुंडे यांच्या संकल्पनेतून हे मोफत सेंटर सुरू करण्यात आले. ऑनलाईनद्वारे त्यांनी या सेंटरचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी रुग्णसेवेच्या या यज्ञकुंडात कार्यकर्त्यांनी आपली समिधा समर्पित करावी, असे आवाहन मुंडे भगिनींनी केले. या सेंटरमध्ये मनुष्यबळ व औषधी ही शासन पुरवणार असून, बाकी सर्व सुविधा मोफत पुरवली जाणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के व शांतीवनचे संस्थापक दीपक नागरगोजे यांनी औपचारिकता म्हणून फीत कापून सेवा प्रारंभ झाल्याचे घोषित केले.

यावेळी जि. प. सदस्य रामराव खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर, वैजिनाथ मिसाळ, विक्रांत हजारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, डॉ. रमणलाल बडजाते, रामदास बडे, संतोष राख, ॲड. रामकृष्ण मिसाळ, प्रकाश बडे, उपसभापती जालिंदर सानप, बाजीराव सानप, विवेक पाखरे, प्रल्हाद धनगुडे, राम कांबळे, संदीप ढाकणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दीपक नागरगोजे यांनी केले.

स्व. लोकनेते गोपिनाथ मुंडे व आनंदवनचे महापुरुष बाबा आमटे यांना अभिप्रेत असलेली सेवा या सेंटरमध्ये मोफत दिली जाणार आहे. रुग्णांना एकही पैसादेखील खर्च लागणार नसून, सर्व सुविधा चांगल्या प्रतीच्या दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन शंकर देशमुख यांनी केले.

===Photopath===

130521\vijaykumar gadekar_img-20210513-wa0009_14.jpg

Web Title: Free Covid Isolation Center with 100 beds started in Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.