कऱ्हेवडगावला १५० जणांची मोफत नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:38 AM2021-08-21T04:38:37+5:302021-08-21T04:38:37+5:30
सरपंच वंदना गायकवाड, उपसरपंच सुग्रीव नागरगोजे व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पुण्याचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. एच. व्ही. देसाई यांच्या सहकार्याने २० ...
सरपंच वंदना गायकवाड, उपसरपंच सुग्रीव नागरगोजे व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पुण्याचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. एच. व्ही. देसाई यांच्या सहकार्याने २० ऑगस्ट रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.
शिबिराचे उद्घाटन सरपंच वंदना गायकवाड, परिवंत गायकवाड यांच्या हस्ते झाले. यात १५० ग्रामस्थांनी नेत्र तपासणी, तर ४० ग्रामस्थांना अल्प दरात चष्मा दिला. दहा जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली. महंमदवाडी हडपसर पुणे येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहेत.
यावेळी माजी सरपंच गंगाधर गायकवाड, उपसरपंच सुग्रीव नागरगोजे, सदस्य जालिंदर खांडवे, अशोक विधाते, अर्जुन बांगर, शरद खांडवे, उत्तम नागरगोजे, हनुमंत गायकवाड, संजय गायकवाड, नीलेश गायकवाड, बाळू खांडवे, बळीराम खांडवे, जालिंदर विधाते, सोमनाथ नागरगोजे, विठ्ठल विधाते, किशोर बांगर, परमेश्वर देशमुख, दादासाहेब खाडे, किरण गायकवाड, सुरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. डॉ. नितीन शिंदे, डॉ. तुकाराम पाटील यांनी नेत्र तपासणी केली. यासाठी आशासेविका सुवर्णा गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी सलवार शेख यांनी परिश्रम घेतले.
200821\img-20210820-wa0300_14.jpg
क-हेवडगांवला १५० जणांची मोफत नेत्र तपासणी