गरजूंना मोफत मास्क, फळांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:52+5:302021-08-20T04:38:52+5:30

अंबाजोगाई : विश्व ग्रामीण विकास सेवाभावी संस्था अंबाजोगाई व मानिनी फाउंडेशन, पुणे तसेच आराध्य स्पोर्टस, पुणे ...

Free masks for the needy, distribution of fruits | गरजूंना मोफत मास्क, फळांचे वाटप

गरजूंना मोफत मास्क, फळांचे वाटप

Next

अंबाजोगाई : विश्व ग्रामीण विकास सेवाभावी संस्था अंबाजोगाई व मानिनी फाउंडेशन, पुणे तसेच आराध्य स्पोर्टस, पुणे यांच्या वतीने जीवन आधार वृद्धाश्रम, पिंपळा या ठिकाणी आजीआजोबांनी कोरोना आजारापासून सुरक्षित राहावे यासाठी त्यांना मोफत मास्क व फळांचे वाटप करण्यात आले.

तसेच गणेशनगर, बलुत्याचा मळा या ठिकाणी बचतगटातील महिलांनाही मोफत मास्क वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना आजाराबद्दल जनजागृतीही करण्यात आली. ज्यांनी कोरोनाची लस घेतली नाही, अशांना लस घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. या कार्यासाठी मानिनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भारती चव्हाण, तसेच आराध्य स्पोर्टचे राहुल धवन यांचे सहकार्य लाभले. अतिशय उत्तम गुणवत्ता असलेले मास्क त्यांनी गरजू व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिले. यावेळी प्रा. डॉ. हनुमंत साळुंके, जीवन आधारचे प्रमुख पवन गिरवलकर, सालेम पठाण, विश्वास लवंद, प्राजक्ता काळदाते, विश्व ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष धनराज पवार उपस्थित होते.

190821\img-20210816-wa0004.jpg

भक्तीप्रेम आश्रम येथे मास्क व फळांचे वाटप

Web Title: Free masks for the needy, distribution of fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.