परळीत कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी मोफत वाहन व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:53+5:302021-04-21T04:33:53+5:30
परळी : शहरातील कोरोना रुग्णांसाठी आरोग्य मित्र संघटनेच्या वतीने मंगळवारपासून मोफत वाहन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. रुग्णांना ...
परळी : शहरातील कोरोना रुग्णांसाठी आरोग्य मित्र संघटनेच्या वतीने मंगळवारपासून मोफत वाहन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. रुग्णांना त्यांच्या घरापासून संबंधित रुग्णालय किंवा कोविड सेंटरपर्यंत जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
परळी शहरात दररोजचे ५० ते ७५ दरम्यान कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना संचारबंदी व आजारामुळे अनेकांना रुग्णालयात जाईपर्यंत वेळ लागतो. आयत्या वेळी वाहन मिळत नाही. अनेकांना या अडचणीचा सामना करावा लागतो. ही गरज ओळखून आरोग्य मित्र संघटनेने हा उपक्रम सुरू केला आहे. ही सुविधा फक्त परळी शहरासाठीच आहे, असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या संचारबंदी असल्याने वाहतुकीचे नियम कडक आहेत. अनेक वाहनचालक जोखीम नको म्हणून रुग्णांची ये-जा करण्यास नकार देतात. ही अडचण लक्षात घेऊन आम्ही परळी शहरात रुग्णांसाठी कार, ऑटो रिक्षा अशी वाहनव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
- चंदुलाल बियाणी, ‘आरोग्य मित्र’चे प्रदेशाध्यक्ष, परळी.
ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी केंद्रावर जाण्यासाठीसुद्धा मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंगळवारी दोन तासांत सहाजणांना रिक्षातून लसीकरणासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन गेलो.
- राहुल बारड, ऑटो रिक्षाचालक, परळी.