माजलगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोनावर मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:35 AM2021-05-11T04:35:25+5:302021-05-11T04:35:25+5:30
माजलगाव : दिवसेंदिवस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे माजलगाव परिसरात शासकीय कोविड सेंटरसह खासगी रुग्णालयांमधून उपचार देणे ...
माजलगाव : दिवसेंदिवस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे माजलगाव परिसरात शासकीय कोविड सेंटरसह खासगी रुग्णालयांमधून उपचार देणे सुरु झाले आहे. परंतु, सर्वसामान्यांना या रुग्णालयांचा खर्च पेलणे शक्य नसल्याने माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोनावर मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. याठिकाणी ३० बेड ऑक्सिजनच्या सुविधेसह व औषधोपचारही मोफत केले जाणार आहेत.
वाढत्या कोविड रुग्णांसाठी शहर परिसरात देशपांडे, यशवंत, माऊली, व्यंकटेश, तुळजाभवानी, जमियत, योगीराज, आदी ठिकाणी उपचार केले जातात. परंतु, काही ठिकाणचा खर्च सामान्यांना परवडत नाही तर काही ठिकाणी सुविधेचा अभाव आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, असे रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. परंतु, गरीब, सर्वसामान्यांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. अशा रुग्णांसाठी माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात येत्या तीन दिवसात शासकीय कोविड उपचार केंद्र सुरू होणार आहे. या ठिकाणी ३० खाटा ऑक्सिजनच्या सुविधेसह राहणार असून, उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत इलाज केला जाणार आहे. त्याचप्रमाणे रेमडेसिविर इंजेक्शनसह औषध सुविधाही याठिकाणी मोफत पुरविण्यात येणार आहे. डॉ. सुरेश साबळे, डॉ. गजानन रुद्रवार, डॉ. वारकरी, डॉ. कुलकर्णी अशा तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
प्रसुती कक्ष इतरत्र हलविणार
ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीत असणारा प्रसुती कक्ष याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याने इतरत्र हलविण्यात येणार आहे. त्याठिकाणी गरोदर महिलांची प्रसुती व माता-बाल उपचार व देखभाल करण्यात येणार आहे.
===Photopath===
100521\purusttam karva_img-20210510-wa0025_14.jpg~100521\purusttam karva_img-20210510-wa0026_14.jpg