बीडमध्ये १० हजार जणांचे मोफत लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:32+5:302021-07-22T04:21:32+5:30
बीड : शहरात मोफत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरणाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत १९ एप्रिलपर्यंत ...
बीड : शहरात मोफत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरणाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत १९ एप्रिलपर्यंत जवळपास १० हजार ९० जणांनी याचा लाभ घेतला.
आरोग्य विभागाच्या सहकार्याने अविनाश नाईकवाडे युवा मंचच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. बीड शहरात माँ वैष्णव पॅलेस मंगल कार्यालय, एम. आय. डी. सी., संत सावता माळी चौक, प्रयाग मंगल कार्यालय, शुक्रवार पेठ, गणपती मंदिर पेठ, आसेफनगर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ५ ठिकाणी दोन दिवस कोविडचे मोफत लसीकरण अभियान राबविण्यात आले. यावेळी आरोग्यसेवक म्हणून डॉ. सुमिता शिंदे, रोहिणी गुजर, रमेश तांदळे, डॉ. कुलदीप शहाणे, शिंदे विकास, श्रीमती घरत, ताठे प्रणव, काळे शीतल, डॉ. अंजुम, सिस्टर समय्या, डॉ. भोजने, डॉ. अश्विनी कदम, अमित माटेगावकर, सुरेश सुस्कर, रमीज सय्यद, डॉ. अभिजित तोगे, शुभम माने, उषा राठोड, शामबाला कुंभार आदींनी अभियानात सहभाग घेतला होता. या लसीकरण अभियानामुळे १० हजारांवर नागरिकांचे कोविडपासून संरक्षण होण्यासाठी मदत मिळणार आहे. अविनाश नाईकवाडे युवा मंचच्या वतीने चंद्रकांत काळे, माऊली गायकवाड, सिराज तांबोळी, नितीन कोळी, शेख नवीद, राहुल गवळी, किरण ससाणे, स्वप्नील शेटे, सानी सातपुते, सतीश नाईकवाडे, आकाश चांदणे, सलीम सिकलकर, मतीन पटेल, मुकेश क्षीरसागर, आकाश सोनवणे, मनोज नखाते, सूरज लोंढे, पवन शर्मा, प्रदीप घोलप, गणेश गवळी, कृष्णा मुंदडा, विकी कवठेकर, सिद्धार्थ ओझा, बालाजी हटवटे, युवराज वांडरे, ओंकार घोडके आदींसह इतर समन्वयकांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.