स्वातंत्र्यसैनिक भास्करराव देशमुख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 04:03 PM2019-09-10T16:03:07+5:302019-09-10T16:05:16+5:30

भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात होता सक्रीय सहभाग

Freedom fighter Bhaskarrao Deshmukh dies | स्वातंत्र्यसैनिक भास्करराव देशमुख यांचे निधन

स्वातंत्र्यसैनिक भास्करराव देशमुख यांचे निधन

Next

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक भास्करराव देशमुख याचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८ वर्षी निधन झाले. मंगळवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता नांदेड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी ५ वाजता नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नांदेड जिल्ह्यातील चिकाळा येथील मुळ रहिवासी असलेले भास्करराव देशमुख यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात हिरहिरीने सहभाग घेतला होता. इंग्रजांविरुद्ध महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या स्वातंत्र लढ्यात नांदेड जिल्ह्यातील ते एक प्रमुख कार्यकर्ते होते. त्यावेळेसच्या अनेक आंदोलनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात सहभाग घेतला होता. 

भास्करराव देशमुख मागील अनेक दिवसापासून वृद्धापकाळाने आजारी होते. त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वी अन्ननलिकेच्या त्रासावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात व अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मध्यंतरी या आजारातुन थोडा दिलासा मिळाल्यावर त्यांनी नांदेड येथे आराम करणे पसंद केले असल्यामुळे सध्या ते नांदेड येथेच वास्तव्यास होते. गत दोन दिवसांपासून त्यांना परत त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही. यातच आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि पुणे येथील उद्योजक मुकुंद देशमुख यांचे ते वडील होत.

Web Title: Freedom fighter Bhaskarrao Deshmukh dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.