विस्थापित शिक्षकांचे शुक्रवारी समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:01 AM2019-06-20T00:01:57+5:302019-06-20T00:02:30+5:30
विस्थापित शिक्षकांचे २१ जून रोजी समुपदेशन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील १०८० प्राथमिक संवर्गातील शिक्षकांच्या आॅनलाईन आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर या प्रक्रियेतून विस्थापित शिक्षकांचे २१ जून रोजी समुपदेशन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
१५ जून रोजी एनआयसीकडून आंतरजिल्हा बदल्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील विस्थापित झालेल्या १५२ शिक्षकांची यादी समायोजनेबाबत सुमपदेशन प्रक्रियेसाठी एनआयसीकडून प्राप्त झाली होती. याबरोबरच २०१८ मध्ये विस्थापित झालेले शिक्षक ज्यांना गैरसोयीची पदस्थापना मिळालेली आहे. त्यांना समुपदेशन प्रक्रियेत सामिल होण्यासाठी १८ जूनपर्यंत अर्ज करण्यात सांगण्यात आले होते. तेच २०१८ मध्ये पसंतीुसार शाळा न भेटल्या कारणाने न्यायालयात गेलेल्या शिक्षकांना न्यायालय निर्देशानुसार समुपदेशन प्रक्रियेसाठी संधी देण्यात आलेली आहे. त्यांनी स्वत: समुपदेशनास उपस्थित राहून तसेच २० जून रोजी लेखी कळविणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर ६४ अर्ज प्राप्त असून तालुकास्तरावर जमा अर्ज मागविण्यात आले आहे. तसेच संचमान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचेही समुपदेशन होणार असल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठतेनुसार १८० रिक्त जागांवर समायोजन होणार असल्याचे समजते.