वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मित्राने केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:00+5:302021-08-27T04:37:00+5:30

अंबाजोगाई : शहरातील बेपत्ता असलेल्या वीटभट्टी चालकाचा, मित्रानेच वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून अन्य एकाच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासात उघड ...

A friend invited him to a birthday party | वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मित्राने केला घात

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मित्राने केला घात

Next

अंबाजोगाई : शहरातील बेपत्ता असलेल्या वीटभट्टी चालकाचा, मित्रानेच वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून अन्य एकाच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अवघ्या २४ तासात या खुनाचा मागोवा काढण्यात बर्दापूर पोलिसांना यश आले असून मुख्य आरोपीला रेणापूर येथून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फारुख लतीफ मोमीन (वय ४५, रा. कोठाड गल्ली, अंबाजोगाई) असे मयत वीटभट्टी चालकाचे नाव आहे. फारुख यांची धायगुडा पिंपळा दूरदर्शन केंद्राजवळ वीटभट्टी आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता फारूख हे काही कामानिमित्त घराबाहेर पडले. मंगळवारी सायंकाळी परळी-अंबाजोगाई रोडवर गिरवली शिवारात मुंडे यांच्या शेतात आढळलेल्या मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरून तो फारुख यांचाच असल्याची ओळख त्यांच्या मुलाने पटविली. चेहऱ्यावर दुखापत करून आणि शरीरावर मुक्कामार देऊन फारुख यांचा खून केल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले.

मोमीन नाजेश फारुख यांच्या फिर्यादीवरून वाघ्या चाटे आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीवर बर्दापूर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद केला. दरम्यान, वाघ्या चाटे अद्यापही तोंड उघडत नसल्याने या खुनामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. वाघ्याला २७ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

वाढदिवसाच्या पार्टीला गेल्याची मिळाली माहिती

फारुख यांचा मुलगा मोमीन नाजेश फारुख याने वडिलांचे मित्र शेख अझर आली जाकेर अली यांच्याकडे विचारपूस केली असता, वरवटी येथील मित्र मारुती ऊर्फ वाघ्या हनुमंत चाटे (वय ३४, रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फारुख मला घेऊन शेपवाडीजवळील एका ढाब्यावर गेले होते, असे अझर यांनी सांगितले. वाढदिवस साजरा करून अझर अंबाजोगाईला परतले, तर फारुख, वाघ्या आणि अनोळखी एक असे तिघे दुचाकीवरून वरवटीच्या ढाब्यावर जेवणासाठी गेले, अशी माहिती अझर यांनी दिली.

फिल्मी स्टाईलने ‘वाघ्या’ जेरबंद

मृतदेह आढळताच बर्दापूर ठाणे प्रमुख एपीआय रवींद्र शिंदे यांनी नेमलेल्या पथकाने घटनाक्रमातील प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली. त्यातून वाघ्या चाटे यानेच खून केल्याच्या निर्णयाप्रत पोलीस पोहोचले. त्यानंतर पोलीस कर्मचारी चोपणे, केंद्रे, महादेव आवले, सूर्यवंशी, जमादार यांनी वाघ्याचा तपास सुरू केला. तो फरार होण्याच्या बेतात असतानाच तातडीने पथकाने रेणापूर गाठले आणि गुरुवारी पहाटे फिल्मी स्टाईलने रोडवर धावत वाघ्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने, वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून फारुख यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: A friend invited him to a birthday party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.