इंधन दरवाढ,महागाईच्या निषेधार्थ सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:13+5:302021-07-14T04:39:13+5:30

काँग्रेसच्या सायकल रॅलीत बैलगाड्या,घोडे यांचा समावेश अंबाजोगाईत काँग्रेसचे आंदोलन अंबाजोगाई : पेट्रोल,डिझेल,स्वयंपाकाचा गॅस,खाद्यतेल आदी जीवनावश्यक वस्तू महागल्या असून या ...

Fuel price hike, bicycle rally to protest inflation | इंधन दरवाढ,महागाईच्या निषेधार्थ सायकल रॅली

इंधन दरवाढ,महागाईच्या निषेधार्थ सायकल रॅली

Next

काँग्रेसच्या सायकल रॅलीत बैलगाड्या,घोडे यांचा समावेश

अंबाजोगाईत काँग्रेसचे आंदोलन

अंबाजोगाई : पेट्रोल,डिझेल,स्वयंपाकाचा गॅस,खाद्यतेल आदी जीवनावश्यक वस्तू महागल्या असून या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारने निर्माण केलेल्या कृत्रिम महागाई विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाईत १२ जुलै रोजी सायकल यात्रा काढण्यात आली.

शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन करून सायकल यात्रा निघाली. सुमारे ७५० सायकलींसह महागाईचा निषेध करणारे फलक,बँड बाजा ,घोडे आणि बैलगाड्यांचा यात समावेश होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष डॉ.जितेंद्र देहाडे, मराठवाडा समन्वयक सिद्धार्थ हत्तीअंबिरे, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्यासह स्वतः सायकल चालवत नेतृत्व केले. पुढील काही दिवसात राज्यस्तरावर सायकल यात्रा,पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात सह्यांची मोहीम आदी मार्गाने केंद्र सरकारचा निषेध नोंदविला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले. यावेळी डॉ.जितेंद्र देहाडे म्हणाले की,केंद्राच्या जनहितविरोधी धोरणामुळे पेट्रोल,डिझेल,गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत.यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.

या यात्रेत प्रशांत पवार, राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके, गोविंद पोतंगले, औदुंबर मोरे, नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, अमोल लोमटे, वाजेद खतीब, सुनील व्यवहारे, धम्मपाल सरवदे,माणिक वडवणकर,राणा चव्हाण,सुनील वाघाळकर,गणेश मसने,सज्जन गाठाळ, अनिस मोमीन,ॲड.घोगरे,भारत जोगदंड,ॲड.बेग,महेबूब गवळी,अशोक देवकर,पांडुरंग देशमुख,शेख मुख्तार आदींसह काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठिण

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल,डिझेल,गॅसच्या किमती भरमसाट वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. याचा निषेध बीड जिल्ह्यात सर्वत्र सायकल रॅली काढून करण्यात आला. काँग्रेस शासनाच्या काळात सिलिंडरचे दर ३४४/- रूपये होते, आता ते ९४२/- वर पोहोचले आहेत. त्यावरची सबसिडी देखील नाहीशी झाली आहे.

- राजकिशोर मोदी, अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी

120721\img-20210712-wa0063.jpg

काँग्रेस पक्षाची अंबाजोगाईत निघालेली सायकल रॅली

Web Title: Fuel price hike, bicycle rally to protest inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.