खून करून फरार झाले, जामिनासाठी दरोडा टाकताना पकडलेे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:26+5:302021-09-19T04:35:26+5:30

माजलगाव : जुन्या भांडणातून एका तरुणाचा खून करून फरार झालेल्या दोन आरोपींना पुण्यात सराफा दुकान फोडून सुमारे ५० लाख ...

Fugitive from murder, caught robbing for bail | खून करून फरार झाले, जामिनासाठी दरोडा टाकताना पकडलेे

खून करून फरार झाले, जामिनासाठी दरोडा टाकताना पकडलेे

Next

माजलगाव : जुन्या भांडणातून एका तरुणाचा खून करून फरार झालेल्या दोन आरोपींना पुण्यात सराफा दुकान फोडून सुमारे ५० लाख रुपयांचा ऐवज लुटण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी पकडलेल्या या आरोपींकडे चौकशी केल्यावर त्यांनी धक्कादायक खुलासा केला. माजलगाव येथे केलेल्या खुनात जामीन मिळावा, यासाठी सराफा दुकानात दरोड्याचा कट रचला. मात्र, हा कट अयशस्वी झाल्याने हाती बेड्या पडल्या. त्यांना १८ सप्टेंबर रोजी माजलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

शहरातील नवीन बसस्थानकाजवळ

भागवत अशोक आगे ( वय २५) याचा तिघांनी खून केला होता. महेश अशोक सोळंके याला अटक करण्यात आली होती. मारुती अशोक सोळंके व अशोक जगन्नाथ सावंत हे दोघेजण फरार झाले होते. सहा महिने उलटूनही त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नव्हते. दरम्यान, २६ ऑगस्ट २०२१ रोजी

पुण्यात एका सराफा व्यापाऱ्याच्या दुकानावर दरोडा पडला. यावेळी ५० लाखांची लूट करताना पोलिसांनी त्यांना पकडले. तपासादरम्यान मारुती अशोक सोळंके व अशोक जगन्नाथ सावंत हे माजलगाव येथील खुनाच्या आरोपात फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, भारती विद्यापीठ पुणे पोलिसांनी माजलगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर १८ रोजी माजलगाव शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. माजलगाव येथील खून प्रकरणात जामीन मिळावा यासाठी पैशांची चणचण होती. त्यामुळे त्यांनी दरोड्याचा प्लॅन केला, पण ते पोलिसांच्या तावडीत सापडले.

.....

Web Title: Fugitive from murder, caught robbing for bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.