अयोध्या राम मंदिर उभारणी निधी संकलन; शिरुरमध्ये प्रभू राम अभियान जागृती रथफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:28 AM2021-01-17T04:28:21+5:302021-01-17T04:28:21+5:30
निधी संकलन कार्यालयाचे रीतसर उद्घाटन महंत स्वामी विवेकानंद शास्त्री, तसेच शहराचे ज्येष्ठ नागरिक तथा प्रदीर्घ काळ सरपंच राहिलेले कांतीलाल ...
निधी संकलन कार्यालयाचे रीतसर उद्घाटन महंत स्वामी विवेकानंद शास्त्री, तसेच शहराचे ज्येष्ठ नागरिक तथा प्रदीर्घ काळ सरपंच राहिलेले कांतीलाल देसरडा यांच्या हस्ते करण्यात आले. राम प्रतिमेचे पूजन करून औपचारिकता म्हणून निधी स्वीकारला गेला. यावेळी प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील, निधी संकलन समिती अध्यक्ष राम कांबळे, जि.प.सदस्य शिवाजी पवार, अरुण भालेराव, बबनराव ढाकणे, डॉ.गणेश देशपांडे, डॉ.अनिल बडे, संतोष भांडेकर, अक्षय रणखांब आदींची उपस्थिती होती.
निधी संकलनाबाबत प्रास्ताविक डॉ.संतोष सानप यांनी माहिती दिली, तर विवेकानंद शास्त्री यांनी अयोध्याधीश प्रभू राम मंदिरासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.
निधी संकलनासाठी रामभक्त सेवक म्हणून घरोघरी जाऊन निधी गोळा करण्याचे काम करणार, शिवाय थेट बँक खात्यातही आपला निधी जमा करता येणार असल्याचेही यावेळी सांगितले गेले. नागेश गाडेकर, विजय गिरी, सुधीर भांडेकर, प्रदीप दगडे आदींनी निधी संकलन कार्यक्रमासाठी परिश्रम
घेतले. राम मंदिर उभारणीसाठी शुभारंभालाच महिलांनी हातभार लावत आपले योगदान दिले.