विकासकामाला निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:00+5:302021-08-27T04:36:00+5:30
शिवाजीराव सिरसाट : चोथेवाडी येथे ३४ लाखांच्या कामांचे भूमिपूजन घाटनांदूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकासासाठी भरीव ...
शिवाजीराव सिरसाट : चोथेवाडी येथे ३४ लाखांच्या कामांचे भूमिपूजन
घाटनांदूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकासासाठी भरीव तरतूद केलेली असून, विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव सिरसाट यांनी येथे केले. जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी मतदारसंघातील गावांना मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला आहे. घाटनांदूरपासून जवळच असलेल्या चोथेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या १५व्या वित्त आयोग निधीतून ३४ लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी (दि. २४) करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब निळे होते.
यावेळी शिवाजीराव सिरसाट म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र विकासकामे सुरू असून, विकासकामात कसलेही राजकारण, भेद न करता मतदारसंघातील सर्वच गावांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही.
चोथेवाडी, ता. अंबाजोगाई येथे जिल्हा परिषदेच्या १५व्या वित्त आयोग निधीतून ३४ लक्ष रुपये खर्चातून पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकामासाठी १२ लक्ष रुपये, गाव अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी ७ लक्ष रुपये, गावअंतर्गत पाइपलाइन दुरुस्तीसाठी पाच लक्ष रुपये, आरओ फिल्टर प्लॅन्टसाठी पाच लक्ष रुपये, खुल्या व्यायामशाळेसाठी पाच लक्ष रुपये, अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या उपरही गरज पडल्यास आणखी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राकाँ नेते शिवाजी सिरसाट यांनी याप्रसंगी दिले.
या उद्घाटन कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र वालेकर, ज्ञानोबा जाधव, ॲड. इंद्रजित निळे, सरपंच बाळासाहेब निळे, सूर्यकांत जाधव, बाबूराव जाधव, अर्जुन जाधव, कचरू निळे, लक्ष्मण मिसाळ, बुआजी निळे, ग्रामविकास अधिकारी महेश फड, पंचायत समिती अभियंता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
260821\img-20210824-wa0021.jpg
घाटनांदूर पासून जवळच असलेल्या चोथेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून ३४ लक्ष रूपये खर्चाच्या विविध विकास कामाचे उद्घाटन करताना राकाँचे नेते शिवाजी सिरसाट,सोबत प स सदस्य मच्छींद्र वालेकर,ज्ञानोबा जाधव,अॅड इंद्रजित निळे,सरपंच बालासाहेब निळे,बाबुराव जाधव,अर्जुन जाधव,कचरू निळे आदी .