दोन दिवसांत २४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:48+5:302021-04-18T04:33:48+5:30

दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी तर ...

Funeral on 24 bodies in two days | दोन दिवसांत २४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

दोन दिवसांत २४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

Next

दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी तर जिल्ह्यात विक्रमी १२११ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. यातील ३३७ एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील आहेत. सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजारपेक्षाही अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, तर शेकडो रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे. शुक्रवारी आणि शनिवारी प्रत्येकी १२ असे दोनच दिवसांत एकूण २४ मृतदेहांवर अंबाजोगाई नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.

लगतच्या तालुक्यातील रुग्णांचा ओढा

अंबाजोगाईकडे

शेजारच्या सर्व तालुक्यांतून रुग्ण अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. ही दोन्ही ठिकाणे कोविड रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दरम्यान, या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगरपालिकेची आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे मृत हे एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील नसून त्यापैकी अनेकजण आसपासच्या तालुक्यातील रहिवासी असतात असे संबंधितांनी सांगितले.

===Photopath===

170421\avinash mudegaonkar_img-20210417-wa0092_14.jpg

Web Title: Funeral on 24 bodies in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.