अंबाजोगाईत १३ महिन्यात ५३७ मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:42 AM2021-04-30T04:42:19+5:302021-04-30T04:42:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मागील एक वर्षापासून ते २६ एप्रिल २०२१ या कालावधीत शासन निर्देशानुसार ५३७ मृत कोरोनाबाधित ...

Funeral on 537 dead corona victims in 13 months in Ambajogai - A | अंबाजोगाईत १३ महिन्यात ५३७ मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार - A

अंबाजोगाईत १३ महिन्यात ५३७ मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार - A

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : मागील एक वर्षापासून ते २६ एप्रिल २०२१ या कालावधीत शासन निर्देशानुसार ५३७ मृत कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्थिवावर अंबाजोगाई नगर परिषदेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ही जबाबदारी सांभाळतानाच कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरला दररोज लागणाऱ्या आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबाजोगाई नगर परिषद पुढाकार घेत जनजागृती, प्रबोधन करत आहे. नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा, शासन निर्देशानुसार ज्या कार्यालयात बाधित कर्मचारी आढळले, ती शासकीय कार्यालये, शाळा यासोबतच ज्या कुटुंबांत बाधित रुग्ण आढळले तेथील राहते घर व निवासी जागा येथे सॅनिटायझर फवारणी केलेली आहे.

दहा लाख ५० हजार लीटर एवढा पाणीपुरवठा

अंबाजोगाई नगर परिषदेकडून टी. बी. गिरवलकर कॉलेज सी. सी. सी. यांना ४०० गाद्या, ४३० उशा, ४०० चादरी, ४० मोठे डस्टबीन, १५० छोटे डस्टबीन, १५ नवीन पाणी जार, ६० मोठी बकेट, ४९ छोटी बकेट, ७१ मग, २४ वायपर, २२ पोछा, ४२ टॉयलेट ब्रश तसेच आवश्यकतेनुसार मास्क व सॅनिटायझर आणि स्वच्छताविषयक पूर्ण साहित्य देण्यात आले आहे. जारद्वारे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. लोखंडी सावरगाव कोविड सेंटर, टी. बी. गिरवलकर कॉलेज सी. सी. सी. यांना २८ मार्चपासून आवश्यकतेनुसार दररोज टँकरद्वारे नियमित पाणी देण्यात येते. २८ मार्च ते २६ एप्रिल २०२१ या २९ दिवसांच्या कालावधीत टँकरच्या १२७ खेपांद्वारे तब्बल १० लाख ५० हजार लीटर एवढा पाणीपुरवठा करण्यात आला असून, चार दिवसांपासून लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर रुग्णालयाला पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृहाची पूर्णपणे स्वच्छता, सॅनिटायझर फवारणी केली असून, दररोज घंटागाडीद्वारे येथील कचरा संकलित करण्यात येतो. गरजेनुसार एल. ई. डी. बल्ब बसवून विद्युत व्यवस्था केलेली आहे.

कोविड संकट काळात अंबाजोगाई नगर परिषदेने मदत आणि सुविधेसाठी वाटा उचलला आहे. अंबाजोगाईकरांनी मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करून, गर्दीत जाणे टाळून, आपले हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी आणि कोरोना पार्श्‍वभूमीवर शासन निर्देशांचे व कायद्याचे पालन करावे.

- राजकिशोर मोदी, प्रभारी नगराध्यक्ष, अंबाजोगाई.

Web Title: Funeral on 537 dead corona victims in 13 months in Ambajogai - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.