गहिनीनाथ गडाचा कायापालट करणार; पंकजा मुंडे यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:58 AM2018-01-10T00:58:37+5:302018-01-10T00:59:56+5:30
श्रीसंत वामनभाऊ महाराज हे वैराग्याचे प्रतीक आहे. यासाठी २५ कोटी रूपयांची विकास कामे करणार असून, येणाºया वर्षात गडाचा विकास करून कायापालट करणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
गणेश दळवी।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : श्रीसंत वामनभाऊ महाराज हे वैराग्याचे प्रतीक आहे. यासाठी २५ कोटी रूपयांची विकास कामे करणार असून, येणाºया वर्षात गडाचा विकास करून कायापालट करणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे श्रीसंत वामनभाऊ महाराज यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होत्या. यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, आ.जयदत्त क्षीरसागर, नेवासा आ. बाळासाहेब मुरकुटे, आ.भीमराव धोंडे, बीड जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आ.साहेबराव दरेकर, रेश्मी बागल, जयदत्त धस, रामदास बडे, माऊली जरांगे, सतीश शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरूवातीस ११.४५ वा. पुष्पवृष्टी करून श्रीसंत वामनभाऊ महाराज यांची आरती करण्यात आली. त्यानंतर गडाचे महंत ह.भ.प.विठ्ठल महाराज शास्त्री यांनी प्रास्ताविक केले. पुढे बोलताना पालकमंत्री मुंडे म्हणाल्या, मी ज्यावेळेस मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आले त्यावेळेस मला गडावर येण्यास उशीर झाला. त्यावेळेस मी सांगितले की, येथे येणाºया प्रत्येक भाविकांच्या पोटातले पाणी हलणार नाही आणि त्याच पध्दतीने आज गडाच्या चारही बाजूचे रस्ते चांगले केले आहेत. येथून पुढेही या गडाचा विकास करणार असून, मला येथे काही मागायला आले नाही तर श्रीसंत वामनभाऊच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे म्हणाले, या गडाची महती दिवसेंदिवस वाढत आहे. या गडाचा सर्वांगिण विकास करण्यास व आलेल्या भक्तांना सर्व मुलभूत सुविधा मिळण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे करण्यास कटीबध्द असल्याचे ते म्हणाले. आ.भीमराव धोंडे, आ.जयदत्त क्षीरसागर, रेश्मी बागल यांनी मनोगत व्यक्त केले.
पुढच्या वर्षी हेलिकॉप्टरने येणार
दरवर्षी मी याठिकाणी हेलिकॉप्टरने येत असते. परंतु यावर्षी मी कारने आले आहे. पण मला काही चुकल्या सारखेच वाटत आहे. येथून पुढे मी या ठिकाणी हेलिकॉप्टरनेच येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बोधले महाराजांचे कीर्तन
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे ह.भ.प. प्रभाकर महाराज बोधले यांचे कीर्तन झाले. आ.भीमराव धोंडे, आ.जयदत्त क्षीरसागर, माजी आ.साहेबराव दरेकर, बाळासाहेब आजबे, बबन झांबरे, ह.भ.प.सविता खेडकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
४श्रीसंत वामनभाऊ महाराज यांच्या कीर्तीचे वर्णन शब्दात करण्यात येणारे नसल्याचे बोधले महाराज या वेळी म्हणाले.