महिलेस अश्लील व्हिडीओ पाठवणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:48 PM2020-02-28T23:48:33+5:302020-02-28T23:49:35+5:30

शहरातील एका महिलेस व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकच्या माध्यमातून गुप्तता बाळगून अश्लील व्हीडीओ व मेसेज पाठवले जात होते. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gajaad sending pornographic video to a woman | महिलेस अश्लील व्हिडीओ पाठवणारा गजाआड

महिलेस अश्लील व्हिडीओ पाठवणारा गजाआड

Next

बीड : शहरातील एका महिलेस व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकच्या माध्यमातून गुप्तता बाळगून अश्लील व्हीडीओ व मेसेज पाठवले जात होते. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीची कुठलीही ओळख नसताना सायबरसेलच्या मदतीने शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई करत आरोपी शेख खदीर शेख समी (रा. भालदारपुरा, बारदरी मशीदजवळ पेठ बीड ) याला २८ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.
खदीर हा शहरातील एका महिलेस व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्हीडीओ कॉल करून अश्लील चाळे केले जात होते. तसेच वारंवार पॉर्न व्हिडीओ देखील पाठवले जात होते. यासंदर्भात पीडित महिलेने वेळोवेळी कॉल करून व्हिडीओ पाठवणारा कोण आहे, याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र, आरोपीकडून ओळख लपवली जात होती. दरम्यान हा मनस्ताप सहन न झाल्याने पीडित महिलेने या नंबर विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान याप्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या मपोउपनि मीना तुपे या करत होत्या. दोन दिवस सायबरसेलच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप नंबरचे लोकेशन घेऊन आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला जात होता. काही संशयित देखील ताब्यात घेतले. मात्र, खदीर हा ज्या नंबरवरून व्हॉट्सप कॉल व मेसेज करत होता, तो नंबर त्याने बंद करून एका अ‍ॅपच्याद्वारे तो सोशल मीडिया वापरत होता.
दरम्यान सायबर सेलच्या माध्यमातून व्हॉट्सप कोण वापरतो, त्याचे लोकेशन काढले. त्यानुसार छापा मारत २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री भालदापुरा येथे छापा ठाकून शेख खदीर शेख समी या आरोपीला अटक केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे, डीवायएसपी भास्कर सावंत, पोनि एस.एस.बीर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि मिना तुपे, पोना बालाजी मुळे, पठाण, शिवाजी कागदे, विष्णू चव्हाण, प्रदीप वायभट, सायबरसेलच्या मसपोनि शिंदे, शेख सलीम, सुरवसे नसीर, अन्वर यांनी केली.

Web Title: Gajaad sending pornographic video to a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.