स्पोर्टस् क्लबमध्ये जुगाराचा खेळ, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह ५० जणांवर गुन्हा, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 11:34 AM2021-12-29T11:34:02+5:302021-12-29T11:37:27+5:30

Crime News in Beed : भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत हा अड्डा सुरु होता, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Gambling in sports club of Beed, crime registered against 50 including BJP district president Rajendra Maske, seizure of property worth Rs 75 lakh | स्पोर्टस् क्लबमध्ये जुगाराचा खेळ, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह ५० जणांवर गुन्हा, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्पोर्टस् क्लबमध्ये जुगाराचा खेळ, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह ५० जणांवर गुन्हा, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

बीड: स्पोर्टस् क्लबच्या नावाखाली राजरोस सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर केजचे सहायक अधीक्षक व आयपीएस पंकज कुमावत यांनी छापा टाकून ४७ जणांना रंगेहाथ पकडले. २८ डिसेंबर रोजी ११ वाजता शहराजवळील तळेगाव शिवारात ही कारवाई केली. यावेळी पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत हा अड्डा सुरु होता, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (FIR against 50 including Beed BJP district president Rajendra Maske in gambling case )

आयपीएस पंकज कुमावत यांनी यापूर्वी गुटखा प्रकरणात धडक कारवाया केल्या. बीडमधील गुटख्याच्या गोदामावर टाकलेल्या धाडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद केल्याने कुमावत चर्चेत आले होते. पाठोपाठ त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेतील जुगारअड्डयाचा पर्दाफाश केला. २८ डिसेंबर रोजी रात्री ११: १० वाजता त्यांनी चऱ्हाटा रोडवरील तळेगाव शिवारात स्पोर्टस् क्लबच्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी ४७ जणांना तिर्रट खेळताना रंगेहाथ पकडले. रोख १ लाख ५१ हजार ९४० रुपये , दोन चारचाकी, जुगार साहित्य व मोबाइल असा एकूण ७५ लाख ६२ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

हवालदार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरुन जुगार खेळताना आढळलेल्या ४७ जणांसह स्पोर्टस् क्लबचा मालक कल्याण पवार, जागा किरायाने घेणारा भाऊसाहेब सावंत व मूळ जागामालक भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक पंकज कुमावत, हवालदार बालाजी दराडे, सचिन अहंकारे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, रामहरी भंडाणे, बीड ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे व सहकाऱ्यांनी केली.

किरायाची जागा किरायाने...
तळेगाव शिवारातील ही जागा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीची आहे. कल्याण पवार (रा.दगडी शहाजानपूर ता.बीड) यांनी स्पोर्टस् क्लबसाठी ती किरायाने घेतली होती. पत्र्याचे शेड उभारुन त्यात स्पोर्टस् क्लब तयार केले होते. मात्र, नंतर पवार यांनी ही जागा भाऊसाहेब सावंत (रा.नवी मुंबई ) यांना किरायाने दिली. तेथे स्पोर्टस् क्लबच्या आडून जुगाराचा खेळ सुरु होता, त्यामुळे तिघांनाही आरोपी केले आहे. पार्टी विथ डिफरन्सची शेखी मिरवणाऱ्रूा भाजप पदाधिकाऱ्रूाच्याचे नाव जुगार अड्ड्याशी जोडले गेल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Gambling in sports club of Beed, crime registered against 50 including BJP district president Rajendra Maske, seizure of property worth Rs 75 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.